वयाची पन्नाशी ओलांडली तरी चेहऱ्यावर विशीचं तेज, मराठमोळ्या अभिनेत्रींचा साधेपणा

Marathi Actress Beauty Secret : तरुणींनाही मागे टाकेल अशी मराठमोळ्या अभिनेत्रींची तजेलदार त्वचा. सौंदर्याला वयाचे बंधन नसते. वय तर हा फक्त आकडा असल्याचं मराठमोळ्या अभिनेत्रींनी अधोरेखित केलं आहे. वयाच्या पन्नाशीत किंवा त्याच्या आसपास असलेल्या अभिनेत्रींनी आजही तरुणींना लाजवेल असं चेहऱ्याचं सौंदर्य जपलं आहे. अशाच मराठी अभिनेत्रींची आपण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांनी बॉलिवूड आणि हिंदी मालिकांमध्ये स्वतःच वेगळेपण जपलं आहे. 

| Jun 06, 2024, 16:41 PM IST
1/8

ऐश्वर्या नारकर

Anti Aging Tips

10 मे 1970 साली जन्मलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकरचा जन्म झाला. आज त्यांचं 54 वय असून सोशल मीडियावर अतिशय ऍक्टिव आहे. ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिलं आहे. याचा ग्लो त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसतो. योगा, मेडिटेशन करणाऱ्या ऐश्वर्या नारकर विशीतील तरुणींना लाजवतील असा फिटनेस ठेवतात. 

2/8

अश्विनी भावे

Anti Aging Tips

'लिंबू कलरची साडी' म्हटलं की, आजही आपल्याला अभिनेत्री अश्विनी भावे जाणवते. अश्विनी देखील आपल्या निस्सीम सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडतात. अश्विनी भावे लग्नानंतर परदेशात स्थायिक झाल्या. पण त्या सोशल मीडियावर ऍक्टिव होत्या. 'घरात गणपती' या सिनेमातून त्यांनी पुन्हा पदार्पण केलं. आजही अश्विनी भावे यांच्या सौंदर्याची चर्चा होते. 7 मे 1972 साली अश्विनी भावे यांचा जन्म झाला. 

3/8

माधुरी दीक्षित

Anti Aging Tips

माधुरी दीक्षितचा जन्म 15 मे 1967 साली माधुरीचा जन्म झाला. वयाच्या 57 व्या वर्षी माधुरी दीक्षितचा जलवा कायम आहे. बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षितने आपली स्वतःची ओळख निर्माण केलीय. धक धक गर्ल म्हणून लोकप्रिय असलेल्या माधुरीचे सौंदर्य आजही खास आहे.  माधुरी दीक्षित आपल्या सौंदर्यासोबतच फॅशन स्टेटमेंटमुळे देखील चर्चेत असते. 

4/8

निशिगंधा वाड

Anti Aging Tips

निशिगंधा वाड यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1969 रोजी झाला. वयाच्या 54 व्या वर्षी निशिगंधा यांचा साधेपणा अतिशय खास आहे. तजेलदार त्वचा असलेल्या निशिगंधा वाड आजही सौंदर्याने विशीतील तरुणींना मागे टाकतात. निशिगंधा वाड या सोशल मीडियावर फार ऍक्टिव नाहीत. पण त्यांचं सौंदर्य, त्यांच खास रुप मालिकांमधून चाहत्यांच्या समोर येते. 

5/8

तजेलदार त्वचेसाठी खास टिप्स

Anti Aging Tips

दही दह्यामध्ये तुमच्या त्वचेसाठी आवश्यक अनेक पोषक घटक असतात. दह्यामधील लैक्टिक ऍसिडमध्ये मॉइश्चरायझिंग आणि ब्लीचिंग गुणधर्म असतात ज्यामुळे हे प्रोबायोटिक तुमच्या त्वचेवर लागू केल्यावर त्वचेची काळजी घेण्याचा उत्तम उपाय बनतो. हे तुमच्या त्वचेवर ठिपके आणि डाग येण्यापासून रोखण्यास मदत करते.

6/8

संत्रा

Anti Aging Tips

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे त्वचेच्या काळजीसाठी आवश्यक पोषक असते. शिवाय, या फळामध्ये ब्लीचिंग गुणधर्म आहेत जे त्वचेचा टोन हलका करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली आहेत. ताज्या संत्र्याचा रस नियमित सेवन केल्याने त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा मुलायम राहते.

7/8

बेसन

Anti Aging Tips

तुमची त्वचा सुरक्षितपणे, प्रभावीपणे आणि नैसर्गिकरित्या हलकी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. बेसन हा एक पौष्टिक घटक आहे जो केवळ तुमची त्वचा उजळ करण्यास मदत करत नाही तर ती अत्यंत निरोगी ठेवते.

8/8

लिंबू

Anti Aging Tips

लिंबूमध्ये अम्लीय गुणधर्म असतात जे तुमच्या त्वचेला ब्लीच करण्यास मदत करतात. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी देखील भरपूर असते जे नवीन पेशींच्या निर्मितीस उत्तेजन देते.