ऐसा राजा पुन्हा होणे नाही...! शिवराज्याभिषेक सोहळ्याचे रायगडावरील खास क्षण

किल्‍ले रायगडावर आज 350 वा शिवराज्‍याभिषेक दिन सोहळा. रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हजारो शिवभक्‍तांनी फुलला रायगड, पालखी सोहळयाने होणार सांगता.  शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्‍यक्षिके दाखवण्यात आली.  तसेच शाहिरी पोवाडयांनी जागवली रात्र. 

Jun 06, 2024, 13:49 PM IST

किल्‍ले रायगडावर आज 350 वा शिवराज्‍याभिषेक दिन सोहळा. रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हजारो शिवभक्‍तांनी फुलला रायगड, पालखी सोहळयाने होणार सांगता.  शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्‍यक्षिके दाखवण्यात आली.  तसेच शाहिरी पोवाडयांनी जागवली रात्र. 

1/9

Shivrajyabhishek Sohala 2024

किल्‍ले रायगडावर आज 350 वा शिवराज्‍याभिषेक सोहळा साजरा होत आहे.या निमित्‍ताने रायगड किल्‍ल्‍यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.  

2/9

Shivrajyabhishek Sohala 2024

 सकाळी नगारखान्‍यासमोर ध्‍वजपूजन आणि ध्‍वजारोहणाने कार्यक्रमाची सुरूवात होईल.

3/9

Shivrajyabhishek Sohala 2024

छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. 

4/9

Shivrajyabhishek Sohala 2024

त्‍यानंतर श्रीशिवछत्रपती महाराजांच्‍या पालखीचे वाजतगाजत राजदरबारात आगमन होईल. तेथे राज्‍याभिषेकाच्‍या मुख्‍य सोहळयास सुरूवात होईल

5/9

Shivrajyabhishek Sohala 2024

युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्‍याहस्‍ते मंत्रोच्‍चारात शिवपुतळयाला अभिषेक, सुवर्ण नाण्‍यांचा अभिषेक होईल. छत्रपती संभाजीराजे शिवभक्‍तांना संबोधन करतील.

6/9

Shivrajyabhishek Sohala 2024

त्‍यांनतर शिवपालखीचे शिवसमाधीकडे प्रस्‍थान होईल. शिवसमाधीला अभिवादन करून सोहळयाची सांगता होईल. 

7/9

Shivrajyabhishek Sohala 2024

 शिवराज्‍याभिषेक दिनाच्‍या पूर्वसंध्‍येला किल्‍ले रायगडावर मर्दानी , शिवकालीन खेळांची प्रात्‍यक्षिके सादर करण्‍यात आली. रात्री शाहिरी पोवाडयांच्‍या कार्यक्रमाने रंगत आणली.

8/9

Shivrajyabhishek Sohala 2024

हा सोहळा अनुभवण्‍यासाठी आलेल्‍या हजारो शिव भक्‍तांनी किल्‍ले रायगड फुलून गेला आहे.भगवे झेंडे, ढोलताशा यामुळे वातावरण शिवमय झाले आहे. 

9/9

Shivrajyabhishek Sohala 2024

अखिल भारतीय शिवराज्‍याभिषेक महोत्‍सव समितीने या सोहळयाचे आयोजन केले आहे.