दिवाळीत बहुमान असलेलं चमत्कारिक फळ, आरोग्यासाठी शक्तीशाली; वर्षातून फक्त चारच महिने मिळते

शेंदाड फाळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. 

वनिता कांबळे | Nov 01, 2024, 17:33 PM IST

Mouse Melon Benefits : दिवाळी हा हिंदू परंपरेतील अत्यंत महत्वाचा सण आहे. देशभरात सर्वत्र हा सण साजरा केला जातो. दिवाळी सणात  शेंदाड या पदार्थाला फार महत्व असते. शेंदाड हे फळासारखे दिसत असले ती याला भाजी म्हणून खाल्ले जाते. शेंदाड हे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी फळ आहे. जाणून घेऊया याचे फायदे. 

1/7

राक्षसाचा वध म्हणून दिवाळीत अंघोळ केल्यावर शेंदाड पायाखालू फोडून त्याच्या बिया कपाळाला लावल्या जातात. यामुळेच दिवाळीत याला बहुमान असतो. फक्त चार महिने शेदाड हा भाजीचा प्रकार उपलब्ध असतो.  

2/7

शेरनी फळ सध्या शेतकऱ्यांना मोठा नफा मिळवून देत आहे. 

3/7

शेरनी फळ आरोग्यदायक असून प्रतिकारशक्ती वाढवते व त्यामुळे शरीराला देखील पोषक घटक मिळतात. हे फळ शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्सचं भांडार आहे. 

4/7

शेरनी हे फळ अतिशय चविष्ट अलेत. याची अस्सल गावरान भाजी बनवली जाते.  शेरनीचे लोणचे आणि दह्यात वाळवण बनवून देखील वर्षभर शेरनी उपयोगात येते. 

5/7

शेरनी ही वेलवर्गीय वनस्पती शेतात लागवड न करता उगवते, सध्या त्याला फळ लागली असून गर्द हिरवी, पिवळी व छोट्या खरबुजा सारखी ही फळं बाजारात विक्रीला येत आहेत. 

6/7

सध्या शेतशिवारांमध्ये आणि जंगलांमध्ये शेरनी ही रानभाजी उपलब्ध होत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना त्यातून आर्थिक फायदा होत आहे.   

7/7

काकडी, तोंडली, कर्टुली, पडवळ वगैरे भाज्या ज्या कुळातल्या आहेत, त्याच कुळातली ही भाजी आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात ही भाजी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. विगर्भात शेंदाड या भाजीला शेरनी असे म्हणतात.