'हा' आहे बॉलीवूडचा सर्वात महागडा अभिनेता, एका मिनिटासाठी घेतो तब्बल 4 कोटी, सिनेमाची फी ऐकून तर हादरून जाल

Highest Paid Actor Of Bollywood : बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार अभिनेते अभिनेत्री आहेत जे एका सिनेमासाठी 100 ते 150 कोटी रुपये घेतात. पण असे काही स्टार्स आहेत जे सिनेमांमध्ये कॅमिओ करण्यासाठी पैसे घेत नाहीत किंवा अगदी थोड्या पैशांमध्ये सिनेमाच्या मेकर्ससाठी काम करतात. परंतु आज आपण बॉलिवूडच्या अशा एका सुपरस्टार अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत जो एका मिनिटाच्या सीनसाठी तब्बल 4 कोटी रुपये घेतो. तर 8 मिनिटांच्या रोलसाठी इतकी मोठी रक्कम आकारतो की तुम्हाला ऐकून धक्का बसेल. 

Pooja Pawar | Oct 28, 2024, 16:37 PM IST
1/6

बॉलीवूडचा महागडा अभिनेता :

अभिनेते - अभिनेत्री नेहमीच त्यांच्या सिनेमासाठी घेतलेल्या फी विषयी चर्चेत राहतात. बॉलीवूडमध्ये शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार सारखे मोठे अभिनेते चित्रपटात काम करण्यासाठी मोठी रक्कम निर्मात्यांकडून वसूल करतात. आज आपण अशा अभिनेत्याविषयी सांगणार आहोत जो काही मिनिटांच्या कॅमिओ रोलसाठी मोठी फी आकारतो. 

2/6

बॉलिवूडमध्ये 33 वर्षांपासून करतोय काम :  बॉलिवूडमधला सर्वात महागडा अभिनेता 33 वर्षांपासून चित्रपट सृष्टीत काम करत असून त्याने आतापर्यंत जवळपास 94 हुन अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या अभिनेत्याची फॅन फॉलोईंग मोठी असून या सुपरस्टार अभिनेत्याने त्याच्या 33 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. तर त्याचे काही सिनेमे हे फ्लॉप सुद्धा ठरले पण याचा त्याच्या फॅन फॉलोइंगवर काही परिणाम झाला नाही. 

3/6

पहिली फी होती 5 हजार :

अजय देवगण असं या अभिनेत्याचं नाव असून तो नेहमी त्याच्या हिट सिनेमांसाठी ओळखला जातो. त्याने आपल्या करिअरची सुरुवात ही 1991 मध्ये 'फूल और कांटे' या सिनेमातून केली. जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या सिनेमातून त्याला नवी ओळख मिळाली असून या सिनेमाची फी म्हणून 5 हजार रुपये मिळाले होते. पण आज अजय देवगण त्याच्या एका सिनेमासाठी 100-200 कोटी रुपयांपेक्षा कमी फी घेत नाही. 

4/6

अजय देवगणचं करिअर :

अजय देवगणने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले असून यात 'सिंघम', 'जिगर', 'विजयपथ', 'दिलवाले', 'जान', 'दिलजले', 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' सारख्या सिनेमांचा समावेश आहे. कालांतराने अजय देवगणच्या फीमध्ये वाढ झाली आणि त्याने  2022 मध्ये रिलीज झालेल्या RRR चित्रपटासाठी 35 कोटी रुपये आकारले. 

5/6

1 मिनिटासाठी जवळपास 4.5 कोटी रुपये घेतले:

RRR चित्रपटात अजय देवगणने फक्त 8 मिनिटांचा रोल केला होता. त्यानुसार बघितले तर त्याने 1 मिनिटासाठी जवळपास 4.5 कोटी रुपये घेतले होते. तर यापूर्वी 2022 मध्ये ओटीटी प्लेटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज झालेल्या 'रुद्रा' या सिनेमातुन त्याने ओटीटीवर डेब्यू केला होता. या सीरिजसाठी त्याने 125 कोटी रुपये घेतले होते. ज्यामुळे तो एवढी मोठी फी घेणारा ओटीटीचा सर्वात महागडा अभिनेता ठरला होता. 

6/6

सिंघम अगेन :

अजय देवगण याचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट 1 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाचा क्लॅश कार्तिक आर्यन आणि विद्याबालनचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' शी होणार आहे.  'सिंघम अगेन' 2024 चा मोस्ट अवेटेड सिनेमा असून यात अजय देवगण सोबत अर्जुन कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंह, करीना कपूर, दीपिका पादुकोण, टाइगर श्रॉफ हे बॉलिवूडचे अनेक स्टार्स दिसतील.