आला रे! विदर्भात मान्सूनचं आगमन, पाहा संपूर्ण राज्यात कधी बरसणार...

Monsoon Update : विदर्भात अखेर मान्सूनचं आगमन झालं आहे. विदर्भातल्या (Vidarbha) अनेक भागात मान्सूनने हजेरी लावलीय. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मान्सूनला अनुकूल वातावरण निर्माण झालं. मात्र पुढचे तीन ते चार दिवस विदर्भात जोरदार पावसाचा (Rain) अंदाज आहे. गडचिरोली आणि चंद्रपूरला पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आलाय. तर नागपूर, वर्धा, गोंदियात तसंच पश्चिम विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांनाही पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

| Jun 23, 2023, 21:24 PM IST
1/5

जून महिना सरत आला तरी अद्याप पावसाने दडी मारली आहे. पण अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मानसून अखेर विदर्भात दाखल झाला आहे. गडचिरोली चंद्रपूर भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर मान्सून पोहोचला असून पुढील 72 तासात विदर्भातील संपूर्ण भाग मान्सून व्यापून घेईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आला असूनग नागपूर सह पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ऍलो अलर्ट देण्यात आला आहे.

2/5

विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. पुढील तीन चार दिवसात गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील 72 तासात विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात मान्सून व्यापून घेणार आहे

3/5

25 ते 27 या दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात चांगला पाऊस होईल तर यवतमाळ, वाशीम, अकोला या भागात चांगल्या पावसासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल असं हवामान विभागाने सांगितलं आहे. 

4/5

पेरणीसाठी विदर्भतील शेतकऱ्यांनी तीन चार दिवस वाट पाहून पेरणी करावी असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अनुमान नुसार जुलै महिन्यात समाधानकारक पासून पडणार आहे. या काळात पावसाचा मोठा खंड पडणार नाही असा अंदाज व्यक्त केला जातोय.

5/5

राज्यात मान्सून वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. अरबी समुद्रासह लक्षद्वीप, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार झाले. त्यामुळे वार्‍याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका झाला आहे.