Ajinkya rahane : सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नाही...तरीही अजिंक्य रहाणे उपकर्णधार, हे कसं शक्य झालं?

टीम इंडियाला पुढच्या म्हणजेच जुलै महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे. यासाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली.

| Jun 23, 2023, 20:02 PM IST
1/6

12 जुलै रोजी भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना रंगणार आहे. 

2/6

वेस्ट इंडिज दौऱ्यावरील टेस्ट टीमच्या उपकर्णधारपदाची धुरा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे. 

3/6

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तब्बल 18 महिन्यांनी रहाणेने कमबॅक केलं. यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध चांगला खेळ केला. 

4/6

मात्र यामधील एक बाब म्हणजे, रहाणेकडे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट नाहीये. मुळात तरीही त्याला टेस्ट टीमच्या उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आलीये.

5/6

याचाच अर्थ असा होतो की, बीसीसीआय आणि टीमला अजूनही मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर विश्वास आहे. 

6/6

इतकी मोठी जबाबदारी रहाणेवर दिल्यानंतर बीसीसीआय आणि चाहते यांच्या रहाणेकडून मोठ्या अपेक्षा असणार आहे.