Monsoon : पावसाळ्यात 'या' भाज्या खाऊ नका? आरोग्य बिघडू शकते !

पावसाळा सुरु झाला आहे. अशा स्थितीत अनेक आजार लोकांना बळवतात. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरच्या वस्तू खाऊ नयेत. त्याचबरोबर काही भाज्यांचाही विचार करूनच सेवन करावे. अन्यथा आजाराला निमंत्रण मिळते.

| Jun 27, 2023, 08:04 AM IST
1/5

पावसाळ्यात वांगी खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात वांग्यात असणारे  बारीक किडे पोटात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.

2/5

पावसाळ्यात कोबीचे सेवन करू नये. कारण पावसाळ्यात यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

3/5

पावसाळ्यात मेथी, पालक इत्यादी हिरव्या भाज्यांचे सेवन कमी करावे. कारण त्यामध्ये लहान हिरवे कीटक असतात जे आरोग्य बिघडवू शकतात.

4/5

पावसाळ्यात मशरुम खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात याचे सेवन केल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो आणि तुम्हाला पोटदुखीची तक्रारही होऊ शकते.

5/5

पावसाळ्यात फ्लॉवरचे सेवन करु नये. फ्लॉवर तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.