केंद्राच्या 'या' योजनांतून सर्वसामान्यांना मिळतात पैसे, तुम्ही लाभ घेतलात का?

Modi Government Scheme: या आर्थिक मदतीमुळे लोकांनाही मोठा दिलासा मिळतो. लोकांना आर्थिक मदतही मिळते अशा केंद्र सरकारच्या योजनांबद्दल जाणून घेऊया.

| Oct 03, 2023, 14:12 PM IST

Modi Government Scheme: केंद्र सरकार या योजनांच्या माध्यमातून लोकांना आर्थिक मदतही करत आहे.

1/8

केंद्राच्या 'या' योजनांतून सर्वसामान्यांना मिळतात पैसे, तुम्ही लाभ घेतलात का?

Modi Government Scheme in India for Farmers and Citizen

Modi Government Scheme: मोदी सरकारकडून लोकांच्या हितासाठी देशात अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत. या माध्यमातून शासनाकडून विविध स्तरातील लोकांना फायदा होत आहे.

2/8

लोकांना आर्थिक मदत

Modi Government Scheme in India for Farmers and Citizen

सरकार या योजनांच्या माध्यमातून लोकांना आर्थिक मदतही करत आहे. या आर्थिक मदतीमुळे लोकांनाही मोठा दिलासा मिळतो. लोकांना आर्थिक मदतही मिळते अशा केंद्र सरकारच्या योजनांबद्दल जाणून घेऊया.

3/8

पीएम किसान योजना

Modi Government Scheme in India for Farmers and Citizen

पीएम किसान योजना ही खास शेतकऱ्यांसाठी तयार केलेली योजना आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिळतो.

4/8

वर्षभरात 6,000 रुपये

Modi Government Scheme in India for Farmers and Citizen

पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षभरात 6,000 रुपये जमा केले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000-2000 रुपयांच्या हफ्त्यात जमा केली जाते.

5/8

प्रधानमंत्री मुद्रा योजना

Modi Government Scheme in India for Farmers and Citizen

ही योजना पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात सुरू झाली होती. या योजनेद्वारे सरकारकडून स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जात आहे आणि लोकांना वेगवेगळ्या श्रेणीनुसार कर्ज दिले जाते.

6/8

आर्थिक मदत

Modi Government Scheme in India for Farmers and Citizen

या योजनेंतर्गत बाल प्रवर्गात 50 हजार रुपये, किशोर प्रवर्गात 50 हजार ते 5 लाख रुपये आणि युवा वर्गासाठी 5 लाख ते 10 लाख रुपये मदत दिली जाते.

7/8

अटल पेन्शन योजना

Modi Government Scheme in India for Farmers and Citizen

तुम्हाला पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, तर मोदी सरकारकडून अटल पेन्शन योजना दिली जात आहे. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक गुंतवणूक करू शकतात.

8/8

पेन्शन

Modi Government Scheme in India for Farmers and Citizen

त्यानंतर निवृत्तीचे वय झाल्यानंतर या योजनेअंतर्गत लोकांना एक हजार, दोन हजार, तीन हजार किंवा पाच हजार रुपये पेन्शन मिळू शकते.