Modi Cabinet Photo : मोदी 3.0 सरकारमध्ये महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट, 'यांना' लागली लॉटरी

Maharashtra Modi Cabinet List : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7.15 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. मोदी 3.0 सरकारमध्ये (Narendra Modi 3.0 Cabinet) महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची संख्या दुप्पट आहे. जाणून घ्या कोणाला संधी मिळाली आहे ते. 

Jun 09, 2024, 12:22 PM IST
1/7

विदर्भातून भाजप खासदार नितीन गडकरी यांना मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. त्यांनी गेल्या मंत्रिमंडळात गडकरींकडे रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी होती. 

2/7

मुंबईतून पीयूष गोयल यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागलीय. गेल्या टर्ममध्ये गोयल यांनी वाणिज्य उद्योग मंत्रायलय सांभाळलं होतं. 

3/7

जळगाव रावेल मधून खासदार रक्षा खडसे यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. त्यामुळे संसदेत उत्तर महाराष्ट्रातील चेहरा दिसणार आहे. 

4/7

राज्यातील चौथ नाव आहे ते रामदास आठवले यांचं. जातीय समीकरणातून त्यांना मंत्रीपद देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

5/7

शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे प्रतापराव जाधवांनाही मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय. उद्घव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिंदे गटाचा पहिलाच खासदार संसदेत असणार आहे. प्रतापराव जाधव यांच्या रुपात विदर्भातून दोन खासदार संसदेत असणार आहे.   

6/7

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागलीय. त्यामुळे पुण्यात आनंदाचं वातावरण आहे. 

7/7

मोदी मंत्रिमंडळात नारायण राणेंचा पत्ता कट झालाय. गेल्या मंत्रिमंडळात नारायण राणे एमएसएमई मंत्री होते.