घरी पाऊल ठेवताच गायब होते मोबाइल नेटवर्क? 'या' टिप्सने कायमची सुटेल समस्या

स्मार्टफोनमध्ये नेटवर्क नसेल तर आपल्याला काहीच सुचत नाही. अनेक वेळा घरात प्रवेश करताच नेटवर्क निघून जाते. घराच्या डिझाइनमध्ये नेटवर्क गायब होण्याची अनेक कारणे असू शकतात. अनेकांच्या घराची रचना नेटवर्कची समस्येला कारणीभूत ठरते. यामुळे कॉल करण्यापासून ते मेसेज पाठवणे किंवा व्हिडिओ पाहण्यापर्यंत समस्या येऊ लागतात. तुमच्यासोबत असे घडू नये हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही नेटवर्कची समस्या कायमची सोडवू शकता.

| Aug 06, 2023, 10:47 AM IST

Mobile Network: स्मार्टफोनमध्ये नेटवर्क नसेल तर आपल्याला काहीच सुचत नाही. अनेक वेळा घरात प्रवेश करताच नेटवर्क निघून जाते. घराच्या डिझाइनमध्ये नेटवर्क गायब होण्याची अनेक कारणे असू शकतात. अनेकांच्या घराची रचना नेटवर्कची समस्येला कारणीभूत ठरते. यामुळे कॉल करण्यापासून ते मेसेज पाठवणे किंवा व्हिडिओ पाहण्यापर्यंत समस्या येऊ लागतात. तुमच्यासोबत असे घडू नये हे लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही नेटवर्कची समस्या कायमची सोडवू शकता.

1/5

नेटवर्कच्या ठिकाणी बसा

Mobile network disappearing issue in your smartphone technology tips in Marathi

जर तुम्ही खोलीत किंवा घरात प्रवेश करताच नेटवर्क जात असेल तर तुम्ही हॉलमध्ये बसून तुमचा स्मार्टफोन वापरण्याचा प्रयत्न करा. चांगले नेटवर्क मिळेल अशा ठिकामी बसून स्मार्टफोन वापरु शकता. 

2/5

उंच फ्लॅट नको

Mobile network disappearing issue in your smartphone technology tips in Marathi

जर तुम्ही भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत असाल, तर उंच फ्लॅटमध्ये राहणे शक्यतो टाळा. कारण अशा ठिकाणी नेटवर्क कव्हरेज खूप उपयुक्त ठरते. तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या मजल्यावर राहत असाल तर तुम्हाला येथे चांगले नेटवर्क कव्हरेज मिळवा.

3/5

नेटवर्क बूस्टर डिव्हाइस

Mobile network disappearing issue in your smartphone technology tips in Marathi

जास्त नेटवर्कची समस्या कायम राहिल्यास, तुम्ही तुमच्या घरामध्ये नेटवर्क बूस्टर डिव्हाइस वापरु शकता. हे बाजारात 1500 ते 4000 रुपयांपर्यंत सहज उपलब्ध आहे. या उपकरणामुळे तुमच्या घरात वापरल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमधील नेटवर्कची समस्या दूर होणार आहे.

4/5

घराच्या खिडक्यांना काच

Mobile network disappearing issue in your smartphone technology tips in Marathi

बर्‍याच वेळा जड खिडक्यांमुळे नेटवर्कमध्ये अडथळे येतात. अशावेळी तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्यांना काच लावा, जेणेकरून तुमच्या फोनमध्ये नेटवर्क राहील आणि कोणतीही अडचण येणार नाही.  

5/5

फॉल्स सीलिंग

Mobile network disappearing issue in your smartphone

जर तुमच्या घरात फॉल्स सीलिंग असेल तर त्यामुळे मोबाईल नेटवर्कवरही परिणाम होतो आणि घरी बसून तुमच्या फोनवर कॉल येणार नाहीत आणि तुम्ही इंटरनेट वापरू शकणार नाही. ही समस्या टाळण्यासाठी, तुम्हाला फॉल्स सीलिंग काढली पाहिजे.