तुमचा मोबाईल डेटा लवकर संपतो का? फॉलो करा या टिप्स डेटा संपणारच नाही

डेटा लवकर संपतो अशी तुमची तक्रार असेल आणि मोबाईल डेटाचा कमीत-कमी वापर करून पूर्ण काम करायचे असेल तुम्हाला त्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. जाणून घ्या सविस्तर. 

Nov 18, 2022, 15:12 PM IST

आजकाल वर्क फ्रॉम होम मुळे लोक घरून काम करत आहेत. अशात, साहजिकच डेटाची अधिक आवश्यकता भासते. घरी वाय-फाय असेल तर ठिक. पण, जे लोक कामासाठी मोबाईल डेटा वापरत्तात. त्यांचा डेटा यामुळे लवकर संपतो. अशात मोबाइल डेटा सेव्ह करत त्याचा वापर कमीत-कमी कसा करायचा याकरिता तुम्ही काही टिप्स वापरू शकता. असे अनेक डेटा प्लॅन आहेत जे दररोज 3GB डेटा ऑफर करतात, परंतु जास्त वापरामुळे, हे देखील दिवसभर टिकत नाही.

1/4

मोबाईल डेटा वापरत असताना जे अॅप्स जास्त डेटा वापरतात त्यांचा वापर कमी करा. जसे की अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहणे अधिक डेटा वापरते. तसेच ज्या अॅप्समध्ये जास्त जाहिराती दाखवल्या जातात त्या अॅप्सपासून दूर राहा. कारण असे अॅप्स डेटा तुमचा जास्त खर्चिक करू शकतो.  जर तुम्ही हे अॅप्स वापरणे बंद केले तर डेटा वाया जाणार नाही.  

2/4

डेटा मर्यादा सेट करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला डेटा वापराच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला Data Limit आणि Billing Cycle वर क्लिक करावे लागेल. येथे तुम्ही डेटा सेट करू शकता. जसे आपण 1GB केले आहे, 1GB संपल्यानंतर इंटरनेट बंद होईल.

3/4

मोबाईल डेटा चालवताना मागे अनेक अॅप्स चालू असतात. जे अॅटोमॅटीक अपडेट होत असतात. सेटिंग्जमध्ये जाऊन हे बदलले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला Auto Update Apps Over WiFi Only व निवडावे लागतील. असे केल्याने तुमच्या फोनचे अॅप्स फक्त वाय-फाय वर अपडेट होतील.

4/4

डेटा सेव्हर मोड देखील एक उत्तम पर्याय आहे. डेटा वापर कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो.