Superfood For Mens: पुरुषांच्या उत्तम आरोग्यासाठी वरदान ठरणारे पदार्थ, अनेक आजार राहतील दूर

Nov 18, 2022, 15:44 PM IST
1/5

Dry Fruits

ड्राय फ्रुटस म्हणजेच सुका मेवा. यामध्ये प्रोटीन, फायबर असतात, सोबतच शरीराला मजबुती मिळते आणि बॅड कोलेस्ट्रॉल देखील कमी होण्यास मदत होते. तुमची तुमच्या दररोजच्या आहारात बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड यांचा समावेश करू शकतात.   

2/5

Egges

यामध्ये दुमत नाही की अंडी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. म्हणूनच अनेक डायटिशियन्स दररोजच्या आहारात अंडी खाण्याचा सल्ला देतात. अंड्यांमध्ये प्रोटिन्स, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन B, व्हिटॅमिन D आणि ल्युटीनचा समावेश होतो. ज्याने पुरुषांचं शरीर अधिक मजबूत होण्यास मदत होते.

3/5

fruits and vegetables

भाज्या आणि फळं खाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फळं आणि भाज्या आरोग्यदायी पदार्थांच्या यादीत येतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आढळून येतात. यामधून मोठ्या प्रमाणात कॅलरीज देखील मिळतात. यामुळे पुरुषांमधील रोगप्रतिकारक शक्तीच वाढत नाही तर बॅड कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं. 

4/5

Milk Products

दुधात विविध पोषक तत्व आढळून येतात. म्हणूनच दुधाला संपूर्ण आहार बोललं जातं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरुषांचं शरीर मजबूत करण्यास फायद्याचे ठरतात. सोबतच दह्यामधील गुड बॅक्टेरिया शरीर आणि आतड्यांसाठी फायद्याचे ठरतात. 

5/5

Fatty Fish

सध्या पुरुषांमध्ये हृदयसंबंधित अनेक समस्या पाहायला मिळतात. अगदी  कमी वयात, तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलं. अशात तुमचं हृदय सुधृढ ठेवण्यासाठी फॅटी फिशचा तुमच्या आहारात समावेश करा. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. याचा हृदय सुधृढ राहण्यास फायदा होतो.   (Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचा दैनंदीन जीवनात वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याच्या सत्य असत्यतेची पुष्टी करत नाही)