दक्षिण समुद्रातील सोनेरी मोती, हिरा आणि खास अर्थ... Miss Universe 2024 च्या मुकुटाची खासियत जाणून व्हाल थक्क

गेल्या वर्षीच्या विजेत्या शेनिस पॅलासिओसने या वर्षासाठी बनवलेला अतिशय खास मिस युनिव्हर्स मुकुट  व्हिक्टोरिया केजर थीलविगच्या डोक्यावर सजवला. 

| Nov 17, 2024, 13:36 PM IST

Victoria Kjær Theilvig: गेल्या वर्षीच्या विजेत्या शेनिस पॅलासिओसने या वर्षासाठी बनवलेला अतिशय खास मिस युनिव्हर्स मुकुट  व्हिक्टोरिया केजर थीलविगच्या डोक्यावर सजवला. 

1/7

Victoria Kjær Theilvig: गेल्या वर्षीच्या विजेत्या शेनिस पॅलासिओसने या वर्षासाठी बनवलेला अतिशय खास मिस युनिव्हर्स मुकुट व्हिक्टोरिया केजर थीलविगच्या डोक्यावर सजवला. 

2/7

73 व्या मिस युनिव्हर्स 2024 च्या विजेत्याची निवड झाली आहे. डेन्मार्कची व्हिक्टोरिया केजर थीलविग (Miss Universe 2024 Victoria Kjær Theilvig) मिस युनिव्हर्स 2024 झाली आहे.  

3/7

खासियत जाणून तुम्ही थक्क व्हाल

मिस युनिव्हर्स 2024 ला घालण्यात आलेला मुकुट फारच खास आहे. हा मुकुट (Miss Universe 2024 Crown) खास मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी बनवण्यात आला होता, त्याची खासियत जाणून तुम्ही थक्क व्हाल. चला जाणून घेऊया हा मुकुट इतका खास का आहे.

4/7

मुकुटाचे नाव काय आहे?

मिस युनिव्हर्स 2024 साठी खास बनवलेल्या या मुकुटाचे नाव आहे Lumière de l'Infini म्हणजेच Light of Infinity. महिला सशक्तीकरणाचे प्रतीक म्हणून हा मुकुट ज्वेलमर या पेजेन्ट्स अधिकृत ज्वेलरी पार्टनरच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.  

5/7

मुकुटाचा खास अर्थ

मुकुटावर असलेले हिरा आणि दक्षिण सागरी मोती जीवनाचा स्रोत आणि समुद्राचे सौंदर्य दर्शवतात. हा मुकुट प्रकाश आणि आशेचे प्रतीक, पुढील पिढ्यांच्या अनंत स्वप्नांना मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा आहे. 

6/7

फिलीपिन्सचे राष्ट्रीय रत्न

या मुकुटावरील मोत्यांना फिलीपिन्सचे राष्ट्रीय रत्न देखील म्हटले जाते. हे सोनेरी रंगाचे मोती या मुकुटाच्या सौंदर्यात भर घालत आहेत. गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स विजेती शॅनिस पॅलासिओस हिने मुकुट काढून स्पर्धेच्या शेवटी मिस युनिव्हर्स 2024 व्हिक्टोरिया केजर थेलविगच्या डोक्यावर स्वत:च्या हातांनी ठेवला.

7/7

भारताच्या रिया सिंगचा समावेश

125 देशांतील 130 स्पर्धकांनी या प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये भारताच्या रिया सिंगचा समावेश होता. मात्र, रिया सिंगला टॉप-12 मध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले.