उत्सुकता शिगेला! 'या' तारखेला रिलीज होणार Mirzapur Season 3, जाणून घ्या कुठे पाहाल

कोरोनाच्या युगात, OTT प्लॅटफॉर्म मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून उदयास आले आहेत. तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या वेब सिरीज पाहायला मिळतील. 

Saurabh Talekar | Feb 29, 2024, 21:01 PM IST

Mirzapur Season 3 Released Date : कोरोनाच्या युगात, OTT प्लॅटफॉर्म मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून उदयास आले आहेत. तुम्हाला नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार, एमएक्स प्लेयर यांसारख्या OTT प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या वेब सिरीज पाहायला मिळतील. 

1/7

ओटीटी

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेब सिरीजचा पूर आला आहे. मात्र, काही वेबसिरीज अशा असतात, ज्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असते.

2/7

मिर्झापूर

अशातच ओटीटीवर सर्वाधिक गाजलेली वेब सीरीज म्हणजे मिर्झापूर... मिर्झापूरच्या दोन्ही वेबसिरीजने धुमाकूळ घातला होता. अशातच आता मिर्झापूर सीझन 3 ची तुफान चर्चा सुरू आहे.

3/7

रिलीजची तारीख

अशातच आता मिर्झापूर सीझन 3 च्या रिलीजची तारीख समोर आली आहे. त्यामुळे आता चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 

4/7

मुन्ना त्रिपाठी

मिर्झापूर 2 मध्ये पंकज त्रिपाठीचा मुलगा मुन्ना त्रिपाठी म्हणजेच दिव्येंदू शर्मा याचा मृत्यू दाखवण्यात आला होता. अशातच आता मिर्झापूर सीझन 3 आणखी थ्रिल पहायला मिळू शकतो.

5/7

Amazon प्राईम

GQ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मिर्झापूर 3 मार्चच्या शेवटच्या आठवड्यात Amazon प्राईम वर रिलीज होऊ शकतो. मात्र, याची अधिकृत घोषणा झाली नाही.

6/7

कालिन भैया

मिर्झापूर सीझन 3 मध्ये पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा ​​कालिन भैयाच्या भूमिकेत दिसणार असल्याने हा सिझन देखील चांगलाच गाजेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

7/7

सीझन रिलीज

मिर्झापूरचा पहिला सीझन 16 नोव्हेंबर 2018 रोजी Amazon Prime वर रिलीज झाला होता. त्यानंतर 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुसरा सीझन 23 ऑक्टोबर 2020 रोजी आला होता.