Horoscope May 2023 : शनी वक्री ते मंगळ गोचर, मे महिन्यात बनले 4 महाराजयोग! कसा असेल मे महिन्या तुमच्यासाठी?

May Horoscope 2023 : मे महिन्यात चंद्रग्रहणासोबत 4 ग्रहांचं गोचर असणार आहे.  शुक्र, मंगळ, सूर्य आणि बुध हे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांचा अस्त आणि उदय हे जातकाच्या आयुष्यावर परिणाम करतात. (Monthaly Horoscope May in marathi)

May 01, 2023, 12:44 PM IST

Horoscope May 2023 in marathi : चंद्रग्रहणासोबत 4 ग्रह आपली राशी बदलणार आहेत. शुक्र मिथुन राशीत, मंगळ कर्क राशीत, सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर बुध आपला मार्ग बदलणार आहे. ग्रहांच्या या परिवर्तनामुळे जातकांच्या आयुष्यावर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतात. (May Horoscope 1 May to 31 may 2023 monthly Horoscope Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces)

 

1/13

पाहा 12 राशींचे भविष्य

शनी वक्री ते मंगळ गोचरमुळे मे महिन्यात काही राशींसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे, तर काही राशींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कसा असेल मे महिन्या तुमच्यासाठी जाणून घ्या. (Monthly Horoscope May 2023)

2/13

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी मे महिना अतिशय शुभ सिद्ध होणार आहे. नोकरदार आणि व्यवसायासाठी हा महिना प्रगतीचा ठरणार आहे. व्यवसायामुळे मोठा करार होणार आहे. तर नोकरदार वर्गाला आनंदाची बातमी मिळणार आहे. कामात जरा काळजी घ्या काही समस्यांचा सामना करावा लागेल पण शेवटी काम मार्गी लागेल. आरोग्याची समस्या दूर होईल. कुटुंबात आनंदाच आनंद असणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा महिना उत्तम ठरणार आहे. 

3/13

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी मे महिना संमिश्र असणार आहे. कामाच्या ठिकाणी जरा टेन्शन आणि धावपळ असणार आहे. करिअरमध्ये उत्तम संधी चालू येणार आहे. मात्र व्यवसायिकांना काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. हा महिना जरा खर्चिक ठरणार आहे. नवीन काम किंवा करार करणे टाळा. आर्थिक बाजूदेखील थोडी खालावेल. आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनीही या महिन्यात अभ्यासाकडे लक्ष द्यावे. 

4/13

मिथुन (Gemini)

मिथुन राशीसाठी मे महिना संमिश्र स्वरुपाचा राहणार आहे. कामाच्या ठिकाणी आतापर्यंत केलेला प्रयत्नांना यश मिळणार आहे. कुठल्याही महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. तज्ज्ञांचा सल्ल्यानुसरा गुंतवणूक करा. आर्थिकदृष्ट्या हा महिना फार चांगला नसणार आहे. 

5/13

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी मे महिना हा चांगला ठरणार आहे. या महिन्यात तुमची धावपळ होणार आहे, पण त्यातून तुम्हाला फायदा होणार आहे. नोकरी बदलण्यासाठी हा महिन्या तुमच्यासाठी उत्तम आहे. परदेशात नोकरीची संधी आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी ठिकठाक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्या. 

6/13

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी मे महिना चढ उताराचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पैसे कमावण्याचे अनेक संधी मिळणार आहे. हा महिना खर्चिक ठरणार आहे. जोडीदारासोबत पण वाद होण्याची शक्यता आहे. 

7/13

कन्या (Virgo)

कन्या राशीसाठी मे महिना खूप भाग्यशाली ठरणार आहे. पहिल्याच आठवड्यात आनंदाची बातमी मिळणार आहे. कोर्टकचेरीचे वाद असल्यास ते मार्गी लागतील. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं वरिष्ठांकडून कौतुक होईल. मान सन्मानात वाढ होणार आहे. इतके दिवसापासून असलेली इच्छा या महिन्यात पूर्ण होणार आहेत. 

8/13

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी मे महिना थोडी खूषी थोडा गम असं असणार आहे. करिअरच्या दृष्टीने बाहेर गावी जावं लागणार आहे. नात्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट संबंधित लोकांसाठी हा महिना चांगला आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. 

9/13

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी हा मे महिना संमिश्र असणार आहे. कामात जरा हलगर्जीपणा करु नका. एखादी चूक तुमच्यासाठी घात ठरवू शकते. कामाच्या ठिकाणी टेन्शन वाढणार आहे. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. तुमच्या कामात समस्या निर्माण होऊ शकते. महिन्याच्या शेवटी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम असणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. 

10/13

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी मे महिन्या अतिशय शुभ ठरणार आहे. वेळे आणि शक्तीचा योग वापर केल्यास तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळणार आहे.  या महिन्यामध्ये तुम्ही बोलण्यावर आणि रागावर मात्र नियंत्रण ठेवा अन्यथा होणारी कामंही बिघडू शकतात. कामातील यशामुळे तुम्ही आणि कुटुंब आनंदी राहणार आहे. आरोग्याची थोडी कूरकूर असेल. 

11/13

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठा मे महिन्यात कष्टाचा ठरणार आहे. अनेक संकटाना सामोरे जावं लागणार आहे. कुटुंबात चढ उतार दिसेल. नातेसंबंधाकडे लक्ष द्या. कोणत्याही प्रसंगात निर्णय घेताना शांतपणे घ्या. व्यवसायीकांनी पैशाचा व्यवहार करताना काळजी घ्यावी अन्यथा मोठा फटका बसू शकतो. मुलांकडे लक्ष द्या. त्यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात. 

12/13

कुंभ (Aquarius)

या राशीसाठी मे महिना भाग्यशाली ठरणार आहे. करिअरमध्ये अनेक सकारात्मक बदल घडणार आहेत. मात्र आरोग्याच्या दृष्टीने हा महिना त्रासदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी आणि समाजात मान सन्मान वाढणार आहे. या महिन्यात तुमच्यामध्ये सकारात्मक उर्जा दिसणार आहे. प्रेमसंबंधाच्या नात्यासाठीही हा महिना उत्तम असणार आहे. 

13/13

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना कठीण असणार आहे. अनेक आव्हानाला तोंड द्यावं लागणार आहे. व्यावसायिकांनी करार करताना सावधगिरी बाळगावी. वैवाहिक जीवनात चढ उतार येणार आहेत. अचानक खर्च वाढणार आहे. आरोग्याचा समस्या वाढणार आहेत. पैसा आणि वेळेचे योग्य नियोजन करणे या महिन्यात महत्त्वाचं ठरणार आहे. पैसे कमविण्याचे अनेक मार्ग दिसणार आहेत. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)