Dharmaveer 2: 'दिघेंच्या मृत्यूने पहिला भाग संपला तर..', 'धर्मवीर-2'वरुन राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'बाळासाहेब..'

Sanjay Raut On Dharmaveer 2 Movie: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु असलेल्या धर्मवीर आनंद दिघेंच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर-2' चित्रपटावरुन उद्धव ठाकरे गटाने खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. राऊत काय म्हणालेत पाहूयात...

| Jul 22, 2024, 18:13 PM IST
1/7

Sanjay Raut On Dharmaveer 2

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा म्हणजेच 'धर्मवीर-2' चा ट्रेलर गुरुपोर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित झाला.   

2/7

Sanjay Raut On Dharmaveer 2

मात्र आता 'धर्मवीर-2' चित्रपटावरुन संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. आनंद दिघेंच्या आयुष्याची कथा म्हणून जाहिरात केला जाणारा हा चित्रपट राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

3/7

Sanjay Raut On Dharmaveer 2

'धर्मवीर-2'चे निर्माते आनंद दिघेंच्या स्मृतींचा अपमान करत असल्याचा घणाघातही राऊत यांनी केला. 2022 मध्ये ठाकरे सरकार पडण्याच्या काही काळआधीच 'धर्मवीर' चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर शनिवारी 20 जुलै रोजी 'धर्मवीर-2'चा ट्रेलर प्रदर्शित झाला.

4/7

Sanjay Raut On Dharmaveer 2

विश्वासघात करणाऱ्यांनी राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन हा चित्रपट बनवला असल्याचा आरोप राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तसेच स्वत: केलेला विश्वासघात कसा योग्य आहे हे दाखवण्यासाठी आता दिघेंच्या नावाचा दुरुपयोग केला जात असल्याचंही राऊत मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका करताना म्हणाले.

5/7

Sanjay Raut On Dharmaveer 2

जर पहिला भाग आनंद दिघेंच्या मृत्यूच्या घटनेनं संपला तर चित्रपटाचा दुसरा भाग कसा काय तयार करण्यात आला? असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे.  

6/7

Sanjay Raut On Dharmaveer 2

पुढील काही महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन 'धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित केला जात असल्याचा आरोप राऊतांनी केला.  

7/7

Sanjay Raut On Dharmaveer 2

'धर्मवीर-2' हा चित्रपट राजकीय हेतूने प्रेरित असून हा चित्रपट म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा अपमान आहे. या दोघांमध्येही गुरु-शिष्याचं अतुट नातं होतं, असं राऊत म्हणाले.