मराठी सेलिब्रिटी कपलचं थायलंडमध्ये ‘कहो ना प्यार हैं’ स्टाइल 'हनिमून'! Original ला लाजवतील असे Photos

Marathi Actress Actor Thailand Honeymoon Goes Viral: हे फोटो पहिल्यावर पहिल्यांदा तुम्हाला ऋतिक रोशन आणि अमिषा पटेल यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. फोटोंमध्ये दिसणाऱ्या दोन्ही मराठी कलाकारांबद्दल सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. पाहा त्यांच्या या हनिमूनचे खास फोटो...

Swapnil Ghangale | Jul 27, 2024, 08:27 AM IST
1/8

Akshara adhipati Honeymoon

सध्या मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये एका हनिमूनची चर्चा आहे. मराठी सेलिब्रिटी कपलचं थायलंडमध्ये ‘कहो ना प्यार हैं’ स्टाइल ऑन स्क्रीन 'हनिमून' पार पडलं. या हनिमूनमधील थिम बेस्ड फोटो हे Original ‘कहो ना प्यार हैं’ पिक्चरला लाजवतील असे आहेत. पाहूयात याची झलक या गॅलरीमधून...

2/8

Akshara adhipati Honeymoon

'झी मराठी'वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका सध्या कथानकाबरोबरच त्यांनी केलेल्या एका भन्नाट प्रयोगासाठी चर्चेत आहे. ही गोष्ट म्हणजे या मालिकेतील हनिमून!

3/8

Akshara adhipati Honeymoon

या मालिकेतील प्रमुख पात्र असलेल्या अक्षरा आणि अधिपतीचं (Akshara-Adhipati) लग्न झाल्यानंतर ते हनिमूनसाठी थायलंडला गेल्याचं दाखवण्यात आलं असून त्यांच्या या ऑनस्क्रीन हनिमूनचं शुटींग खरोखरच थायलंडमध्ये पार पडलं आहे. या शूट दरम्यानचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत.

4/8

Akshara adhipati Honeymoon

निर्मात्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयोगामुळे मराठी मालिकांचे बजेट आणि त्यांचा आवाज वाढल्याबद्दल प्रेक्षकांनी समाधान व्यक्त केलं असून तिकडे थायलंडमध्ये शिवानी रांगोळे (अक्षरा) आणि ऋषिकेश शेलार (अधिपती) या दोघांनी थायलंडमध्ये चक्क कहो ना प्यार है टाइप फोटोशूट आणि रिल्स केलेत. 

5/8

Akshara adhipati Honeymoon

मालिकेमधील कथानकानुसार अक्षरा आणि अधिपतीच्या हनिमूनचं (Honeymoon) शूटिंग थायलंडमधील क्राबी (Krabi) या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर शूट करण्यात आलं आहे.  

6/8

Akshara adhipati Honeymoon

‘कहो ना प्यार हैं’ या गाण्यावर आधारित प्रोमोसाठी अक्षरा आणि अधिपती यांनी खास ऋतिक आणि अमिषाप्रमाणेच ड्रेसिंग केलं होतं. दोघे समुद्राच्या किनाऱ्यावर धावताना, रोमान्स करतानाचा हा प्रोमोही सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.  

7/8

Akshara adhipati Honeymoon

हनिमूनची भटकंती दाखवण्यासाठी बोटीमधील फेरफटका आणि इतरही रंजक दृष्यं दाखवण्यात आली आहेत. या शुटींगसाठी मालिकेतील 15 ते 16 जणांची टीम थायलंडला गेली होती असे समजते. 

8/8

Akshara adhipati Honeymoon

ऋषिकेश शेलारने (अधिपती) या माध्यमातून आपली परदेशामध्ये शूटिंग करण्याची इच्छा पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे. नव्या देशात शूटिंग आणि इतर बऱ्याच गोष्टी करणं आव्हानात्मक होतं. मात्र यातही मज्जा आली, असं त्याने सांगितलं.