'रांझना हुआ मैं तेरा...', 'देवमाणूस' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात, पाहा फोटो

'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड विवाहबंधनात अडकला आहे. दोघांचा रोमँटिक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Soneshwar Patil | Dec 14, 2024, 18:31 PM IST
1/7

किरण-वैष्णवी

आज 14 डिसेंबर रोजी 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर विवाहबंधनात अडकले आहेत. 

2/7

धमाल मस्ती

यावेळी नातेवाईक आणि मित्रमंडळी या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. ते या सोहळ्यात धमाल मस्ती करताना दिसले. 

3/7

फोटो व्हायरल

सध्या सोशल मीडियावर किरण आणि वैष्णवीच्या लग्नसोहळ्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहे. 

4/7

कमेंट्सचा वर्षाव

'लागिरं झालं जी' मालिकेतील सर्व कलाकार यावेळी किरणच्या वरातीत धमाल डान्स करत होते. सध्या दोघांवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. 

5/7

सावंतवाडी

किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकरचा हा विवाह सोहळा सावंतवाडीमधील एका रिसॉर्टवर पार पडला. 

6/7

दोघांची ओळख

दोघांची ओळख ही 'देवमाणूस' मालिकेच्या सेटवर झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत होते. आज त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केलीय. 

7/7

लोकप्रियता

किरण गायकवाडला 'लागिरं झालं जी' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. तो या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत होता.