'हा अत्यंत थर्ड क्लास क्रायटेरिया...', सोशल मीडिया स्टार कलाकार होण्यावर प्रसाद ओकची स्पष्ट भूमिका

Marathi Actor Prasad Oak: आजकाल सोशल मीडियावर नेटकरी वेगवेगळे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अशी अनेकांची ओळख होऊ लागली आहे. त्यातही असे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांना फॉलोवर्स आणि व्हायरल रीलच्या जोरावर मालिका आणि चित्रपटात काम करण्याची संधी मिळते. त्यावर आता अभिनेता प्रसाद ओकनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

| May 03, 2024, 09:01 AM IST
1/7

प्रसाद ओक

प्रसाद ओक हा फक्त एक उत्तम अभिनेता नाही तर त्यासोबत एक उत्तम दिग्दर्शक देखील आहे. प्रसादनं त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.   

2/7

इन्फ्लुएन्सरविषयी प्रसाद ओकची प्रतिक्रिया

प्रसाद ओकनं नुकतीच 'कॉकटेल स्टुडिओ'च्या 'इनसाइडर्स' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी प्रसादनं सोशल मीडिया इन्फ्युएन्सर्सला अॅक्टर्स म्हणण्यावर त्याला काय वाटतं याविषयी सांगितलं आहे.   

3/7

हिंदीवाल्यांचा ट्रेंड

प्रसाद म्हणाली की 'ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, म्हणजे थर्ड क्लास क्रायटेरिया. ज्यांचे जास्त फॉलोवर्स तो चांगला किंवा मोठा कलाकार. हा हिंदीवाल्यांचा ट्रेंड आहे, जो मराठीत येऊ पाहतोय.'   

4/7

दिग्दर्शक महत्त्वाचे

'जोपर्यंत मराठीमध्ये परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, प्रवीण तरडे, मी स्वतः, रवी जाधव, विजू माने, अभिजीत पानसे.. अशी अनेक नावं घेता येतील माझ्या सहकारी मित्रांची, जे परफॉर्मन्सवर विश्वास ठेवणारे दिग्दर्शक आहेत. तोपर्यंत फॉलोअर्सच्या कॅटगिरीचा मराठीत काही फार फरक पडेल किंवा त्यानं काही खूप मोठा बदल होईल असं मला तरी वाटतं नाही.'

5/7

प्रसाद पुढे म्हणाला...

'ते हिंदीवाले करतात. पण शेवटी जेव्हा तो एक कलाकार म्हणून कसा आहे हे कळत असेल तेव्हा ते स्वत: त्याला अनफॉलो करत असतील.' 

6/7

प्रसादचा आगामी प्रोजेक्ट

प्रसादच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाले तर तो ‘महापरिनिर्वाण’ ‘गुलकंद’, ‘धर्मवीर २’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘वडापाव’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.   

7/7

दिग्दर्शक