मनोज जरांगेंचं मराठा वादळ पुण्यात धडकलं, लाखो मराठा सहभागी... पाहा Drone ने टिपलेले Photo

Manoj Jarange Morcha Pune Latest Photo: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज येत्या 26 जानेवारीला मुंबईत धडक देणार आहे. लाखो मराठा या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मराठा मोर्चा पुण्यात दाखल झाला असून जरांगेंच्या स्वागतासाठी अभूतपूर्व गर्दी केलीय. 

राजीव कासले | Jan 25, 2024, 10:52 AM IST
1/7

मराठा आंदोलक मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांचं वादळ पुण्यात दाखल झालंय. पुण्यातल्या शिवाजीनगरहून औंधमार्गे हा मोर्चा पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ झालाय. पुण्यातल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी जरांगेंच्या स्वागतासाठी अभूतपूर्व गर्दी दिसतेय. 

2/7

जरांगेंच्या स्वागतासाठी लाखोंचा जनसमुदाय एकत्र आलाय.. जरांगेंची पदयात्रा पुढील दोन दिवसांत मुंबईला धडकणार आहे.. त्याआधी आज रात्री जरांगेंचा मुक्काम लोणावळ्यात असेल.   

3/7

आपण मुंबई बंद पाडण्यासाठी नव्हे तर आरक्षणाच्या माध्य़मातून सामान्यांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठीच मोर्चा काढल्याचा दावा जरांगेंनी केलाय. 

4/7

लोणावळ्यातील जरांगे पाटील यांच्या मुक्कामाच्या ठिकाणची ड्रोन दृश्य समोर आलीयेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यभरातून मराठा एकवटले आहेत. 15 किलोमीटरचा रस्ता व्यापला गेलाय.

5/7

मुंबईकडे निघाला मराठ्यांचा मोर्चा सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या. असा इशारा देत कोल्हापुरातील मराठा कार्यकर्ते मंबईच्या दिशेनं रवाना झालेत...((शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्याच्या माध्यमातून सरकारला इशाराच दिलाय.

6/7

मुंबईतील मराठा आंदोलनामुळे इथलं जनजीवन विस्कळीत होणार नाही ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हायकोर्टानं म्हंटलंय. मनोज जरांगे पाटील आणि मुंबई पोलिसांना उच्च न्यायालयानं नोटीस बजावलीय. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार स्पष्ट करा अशी विचारणा हायकोर्टानं केलीय. 

7/7

मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी ट्रॅप रचला जात असल्याचा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता.. माझ्यावर ट्रॅप रचणा-यांच्या नावांचा लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केलीय... ट्रॅप रचणा-यांची नावं मुंबईत जाहीर करणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिलीय.