मुलं 20 व्या वर्षापासून काम करतात, मुली 27 पर्यंत विचारच करत राहतात... सोनाली कुलकर्णी यांचे वक्तव्य चर्चेत

Sonali Kulkarni : दिल चाहता है, सिंघम, देऊळ यासारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या अभिनेत्री सोनली कुलकर्णी सध्या त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आल्या आहेत. सोनाली कुलकर्णी यांनी दोन आठवड्यांपूर्वी CoachBSR नावाच्या एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमधील एक क्लिप सध्या व्हायरल होतेय. 

Mar 16, 2023, 16:53 PM IST

Sonali Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या एका मुलाखतीमधील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल आहे. सोनाली कुलकर्णी यांनी दिलेल्या मुलाखतीवरुन आता जोरदार चर्चा रंगल्या आहेत. आजकालच्या मुली खूप आळशी झाल्या आहेत. त्यांना आर्थिकदृष्ट्या फक्त तिच्या प्रियकरावर किंवा भावी पतीवर अवलंबून राहायचे आहे, असे मत सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.

1/6

Sonali Kulkarni on indian girl

भारतातील अनेक मुली आळशी आहेत. त्यांना बॉयफ्रेंड किंवा चांगली नोकरी असलेला नवरा हवा असतो. ज्याच्याकडे घर आहे. पण तू माझ्याशी लग्न केल्यावर मी काय करु शकते हे सांगण्याची हिंमत मुलींमध्ये नाही. 

2/6

sonali kulkarni on equality

मला तुम्हा सर्वांना सांगायचे आहे की, तुमच्या घरात अशा महिला निर्माण करा, ज्या सक्षम असतील. ज्या स्वतःसाठी कमवू शकतात. ज्या म्हणू शकतात की आपल्याला नवीन फ्रीज घ्यायचा आहे, तुम्ही अर्धे पैसे द्या, मी अर्धे पैसे देईन.

3/6

sonali kulkarni on husband

तुम्हाला नवरा हवाय की मॉलमधली ऑफर... 18 वर्षे होताच मुलांवर आता कमवायचे आहे, कुटुंबाला आधार द्यायचाय याचा दबाव येतो. मला माझ्या नवऱ्यासाठी, भावांसाठी रडू येते.

4/6

sonali kulkarni on relationship

माझ्या नवऱ्याला वयाच्या 20 व्या वर्षी काम करावे लागले. मुली 25-27 वर्षांच्या होईपर्यंत काय करायचं हाच विचार करत असतात. त्या त्यांच्या प्रियकरावर सतत दबाव आणत असतात. मला लोकांमध्ये भांडणं लावायची नाहीत.

5/6

actress sonali kulkarni

मुलींनी फक्त स्वयंपाक करू नये. त्यापेक्षाही पुढची जबाबदारीही घेतली पाहिजे, असेही सोनाली कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

6/6

sonali kulkarni speech

व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. स्त्री पुरुष समानतेबद्दल सोनाली कुलकर्णी यांनी अगदी योग्य भाष्य केल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. (सर्व फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)