घनदाट धुकं आणि हिरवाईने नटलेले डोंगर, भारतातील 'या' ठिकाणांना नक्की भेट

Monsoon Travel Places: मुसळधार पावसामुळे आणि अतिथंडीत हवेत धुकं पसरतं. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोणी हिलस्टेशन तर कोणी समुद्रकिनारी जाणं पसंत करतं. मात्र भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे पावसाळ्यात आणि थंडीत सर्वात जास्त धुकं पडतं.  

Jul 12, 2024, 11:14 AM IST
1/5

कोडाईकनाल

तामिळनाडूतील हे ठिकाण अतिशय नयनरम्य आहे. तामिल भाषेत कोडाई म्हणजे ऊन आणि कनाल म्हणजे पाहणे. थंड हवेचं ठिकाणं असल्यामुळं खास ऊन्हाळ्यात पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होते. पावसात आणि थंडीत इथले डोंगर हिरव्या रंगाची चादर पांघरतात.  पावसाळ्यात इथल्या डोंगरांवर मोठ्या प्रमाणात धुकं दाटतं.  फोटोशुटसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. 

2/5

पेलिंग

सिक्कीमला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. गंगटोकच्या जवळ असलेलं पेलिंग डोंगरात वसलेलं छोटसं गाव. पेलिंगचा परिसर हा दऱ्या खोऱ्यांनी वेढलेला असल्याने इथं मोठ्या प्रमाणात धुकं पाहायला मिळतं.   

3/5

दार्जिलींग

देशात सर्वाधिक चहाचे मळे दार्जिलींगमध्ये आढळतात, त्यामुळे जगभरातील अनेक चहाप्रेमी इथल्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. मात्र या व्यतिरिक्त दार्जिलींगची वेगळी ओळख म्हणजे इथलं निसर्गसौंदर्य. थंड हवेचं ठिकाण असल्याने दार्जिलींग कायमच धुक्यात हरवलेला असतो.   

4/5

लोणावळा

पुण्या-मुंबईपासून जवळंच आणि एका दिवसात जाता येईल असं ठिकाण म्हणजे लोणावळा. लोणावळा घाट म्हणजे पुणे-मुंबईतील पर्यटकांचं हक्काचं ठिकाण. पाऊस पडल्यानंतर दाटलेलं धुकं आणि इंद्रधनुष्य पाहणं म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूती असते.   

5/5

रायगड

पावसाळ्यात गड किल्यांवर ट्रेकिंगला जायला अनेकांना आवडतं, शुरवीरांचा इतिहास सांगणाऱ्या रायगडाचं सौंदर्य पावसाळ्यात विलोभनीय असतं. हिरवाईने नटलेल्या आणि धुक्याने वेढलेल्या रायगडला एकदा तरी भेट द्यायलाच हवं.