आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला 11 सवाल

मराठा आरक्षण द्या, नाहीतर साडेसाती मागे लावेन असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. 

Oct 27, 2023, 23:31 PM IST

Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला 11 सवाल केलेत... या सवालांची उत्तरं देण्यासाठी उद्या संध्याकाळपर्यंत मुदत त्यांनी दिलीय. 

 

1/11

ज्या जाती आरक्षणात घातल्या त्याच्या उपजाती पोटजाती म्हणून किती अंतर्भाव केला काय पुरावे, निकष दिले हे ही सरकारने उद्या सांगावे. 

2/11

मंडल कमिशन ने 14 टक्के आरक्षण ओबीसी ना दिले कशाचा आधार कुठला निकष लावून 4 वर्षात आरक्षण कसे दिले याचेही निकष सांगावे. 

3/11

ज्या जाती प्रगत झाल्या त्या आरक्षणातून बाहेर काढाव्या असे लिहले आहे का असेल तर सरकारने उत्तर द्यावे.

4/11

.ज्या जाती ज्यांचा 10 वर्षांनी सर्वे करायचे होते ते सर्वे प्रत्येक 10 वर्षाला केले का हे सांगावे. 

5/11

जेवढ्या जाती आरक्षणात घातल्या राज्यात, नेमके कुठले निकष लावून घातल्या ते सरकारने उद्यापर्यंत सांगावे. 

6/11

ज्या जाती व्यवसाय आधारित आरक्षण दिले किंवा दुसऱ्या कुठल्या आधारावर त्यांना आरक्षण दिले ते उद्या सरकारने जाहीर करावे. 

7/11

कुठल्या कुठल्या जाती आरक्षणात घातल्या पुरावे न देता उद्यापर्यंत सरकारने उत्तर द्यावे. 

8/11

ज्या जाती आरक्षणात घातल्या आहेत, 2023 पर्यंत,कुठंकुठल्या जातील पुरव्याच्या आधारावर आरक्षण दिले ते उद्यापर्यंत जाहीर करावे. 

9/11

शिंदे समिती गठीत केली तिला 10 हजार पुरावे सापडले. आता समितीचे काम थांबवून मिळालेल्या पुराव्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देणार का?

10/11

. सरकारने दिल्लीला गेले त्यावेळी पंतप्रधान याना आरक्षण बाबत सांगीतल होत का?

11/11

.कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार अधिवेशन घेणार का?