वडाळा लोकल : महिलेचा विनयभंग; आरोपीला पकडण्यासाठी 'असा' रचला सापळा

वडाळा-पनवेल लोकलमध्ये विनयभंग 

| Jan 05, 2021, 08:24 AM IST

मुंबई : तीन दिवसांपूर्वी हार्बर मार्गावरील वडाळा-पनवेल धावत्या लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करण्यात आला. आरोपीने महिलेला धावत्या लोकलमधून ढकलण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील आरोपीला अखेर पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. राजू बंड्या पांडे असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. 

1/5

१ जानेवारी २०२१ या नववर्षाच्या दिवशी सकाळी पीडित महिला प्रवास करत होती. 

2/5

महिलांच्या वेळेत प्रवास करताना ही महिला एकटीच होती. वडाळा स्थानकातून रेल्वे निघताच आरोपीने महिला डब्यात प्रवेश केला.   

3/5

डब्यात एकट्या असलेल्या महिलेचा गैरफायदा घेत तिचा विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केला असता तिला धावत्या लोकलमधून ढकलून देत तो पसार झाला. 

4/5

या आरोपीला पोलिसांना कोपरखैरणेतून सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. 

5/5

राजू बंडया असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून, नवी मुंबईतल्या कोपखैरणे इथून त्याला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे रेल्वे पोलीसांनी आरोपीचा शोध लावण्या पोलीसांना यश आलं आहे.