Closing Ceremony पूर्वी गोंधळ! Eiffel Tower च्या Olympics चिन्हावर असं काही दिसलं की लागली आणीबाणी

Olympics 2024 Closing Ceremony: ऑलिम्पिकच्या सांगता समारंभाआधी अचानक हा गोंधळ उडाल्याने सर्वच जण थक्क झालं. पोलिसांनी या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट प्रवेशबंदी लागू केली. जाणून घ्या नक्की घडलं काय...

| Aug 12, 2024, 07:52 AM IST
1/7

Man Climbing Eiffel Tower

पॅरिसमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची सांगता भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री पार पडली. मात्र या सोहळ्यापूर्वी पॅरिसमधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरजवळच्या एका घटनेमुळे एकच गोंधळ उडाला.

2/7

Man Climbing Eiffel Tower

ऑलिम्पिक 2024 च्या स्पर्धेची सांगतेआधीच पोलिसांनी या परिसरामध्ये अचानक प्रवेश बंदी लागू केली. याला कारण ठरला आयफेल टॉवरवर चढणारी एक व्यक्ती. शर्टलेस होऊन ही व्यक्ती 330 मीटर (1083 फूट) उचं आयफेल टॉवरवर चढताना दिसल्यावर एकच गोंधळ उडाला.   

3/7

Man Climbing Eiffel Tower

ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर आयफेल टॉवरवर लावण्यात आलेल्या ऑलिम्पिक चिन्हाच्या वरच्या भागावर ही व्यक्ती असतानाच त्याला काही लोकांनी पाहिलं आणि पोलिसांना कावळलं. पोलिसांनी तातडीने हा परिसर रिकामा केला. हा सारा प्रकार फ्रान्समधील वेळेनुसार दुपारी तीनच्या सुमारास घडला. 

4/7

Man Climbing Eiffel Tower

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सुरु असल्याने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सांगता समारंभ आयफेल टॉवरजवळ होणार नव्हता. मात्र अचानक अशाप्रकारे एक व्यक्ती आयफेल टॉवर चढताना दिसल्याने एकच गोंधळ उडाला. 

5/7

Man Climbing Eiffel Tower

अचानक आणीबाणीसारखी घोषणा या परिसरात झाल्याने काही पर्यटक आयफेल टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावर अडकून पडले. त्यांना अर्ध्या तासाने बाहेर काढण्यात आले. "या व्यक्तीने दुपारी 2.45 मिनिटांनी आयफेल टॉवरवर चढण्यास सुरुवात केली. पोलिसांना या व्यक्तीला आडवून त्याला अठक केली आहे," अशी माहिती पॅरीस पोलिसांमधील सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर असोसिएट फ्री प्रेसला दिली आहे.  

6/7

Man Climbing Eiffel Tower

पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून त्याने हे कृत्य का केलं याचा तपास पोलीस करत आहेत. या व्यक्तीसंदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच त्याने हे असं करण्यामागील उद्देशही स्पष्ट झालेला नसून तर्क-वितर्क मांडले जात आहेत.

7/7

Man Climbing Eiffel Tower

आयफेल टॉवर येथेच पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता. ही व्यक्ती संभाव्य हल्लेखोर असू शकते या शक्यतेमधून हा परिसर रिकामा करण्यात आला होता. जवळपास तासभर हा सारा ड्रामा सुरु होता.