Makar Sankranti 2023 : चुकीच्या पद्धतीनं लावू नका हळदी- कुंकू; वाईट परिणाम होण्यापेक्षा वाचा ही माहिती

Makar Sankranti 2023 : नव्या नवरीची हळदी कुंकू इतर कुणाला लावताना धांदलच उडते. नेमकं यासाठी कोणतं बोट वापरायचं हेच तिला कळत नाही. त्यामुळं चारचौघांत नाचक्की होण्याआधी पाहून घ्या ही महत्त्वाची बातमी

Jan 13, 2023, 11:27 AM IST

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांत जवळ आली आहे आणि सध्या अनेक महिलांची घाई सुरुये ती म्हणजे हळदी कुंकू समारंभांचं (Haldi Kunku) आयोजन करण्यासाठी. कोणता दिवस योग्य इथपासून वाण काय द्यायचं, इथपर्यंत अनेक गोष्टींसाठी महिलावर्ग सध्या शक्कल लढवताना दिस आहे. या साऱ्यामध्ये एक महत्त्वाची माहिती इथे आपण पाहणार आहोत. ही माहिती म्हणजे, हळदी- कुंकू लावण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे. 

1/5

Makar Sankranti 2023 what is the Right way to put haldi kunku on forehead

कुंकू आणि हळद या गोष्टी सहसा दोन भुवयांच्या मध्यभागी किंवा कपाळाच्या बरोबर मधोमध लावल्या जातात. असं करत असताना बोटामुळं या भागावर हलकासा दाब दिला जातो. हे बिंदू संपूर्ण शरीरामध्ये असणाऱ्या स्नायूंना रक्तपुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. ज्यामुळं स्नायूंचा ताण कमी होऊन चेहऱ्याची लकाकी वाढते. 

2/5

Makar Sankranti 2023 what is the Right way to put haldi kunku on forehead

कुंकू लावल्यामुळं शरीरात नकारात्मक शक्ती प्रवेश करु शकत नाहीत. सहसा कुंकू आणि हळद अंघोळीनंतर लावावं. 

3/5

Makar Sankranti 2023 : Haldi and Kunku on Forehead

तुम्ही कोणा दुसऱ्या व्यक्तीच्या कपाळी कुंकू लावताय, तर अशा वेळी मध्यमेचा वापर करा. शास्त्रात सांगितल्यानुसार कुंकू लावताना कायम मध्यमेचा होणं अपेक्षित असतं. 

4/5

Makar Sankranti 2023 : Haldi and Kunku on Forehead

असं केल्यामुळं समोरच्या व्यक्तीच्या शरीरात असणारी वाईट उर्जा या बोटानं रोखली जाते. दुसऱ्या कोणत्याही बोटानं दुसऱ्या व्यक्तीला कुंकू लावल्यास या नकारात्मक शक्ती सहजगत्या आपल्या शरीरात येऊ शकतात. 

5/5

Makar Sankranti 2023 : Haldi and Kunku on Forehead

तेव्हा मकर संक्रांतीची (Makar Sankranti 2023) वाट पाहण्यापेक्षा या क्षणापासूनच तुम्ही कुणालाही हळद- कुंकू लावत असाल तर या लहानसहान पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वत:सोबत इतरांचंही आरोग्य जपा.  (वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)