Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरी आणा, बदलेल तुमचं नशीब?

Mahashivratri 2024 : या वर्षी 8 मार्च 2024 ला महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येणार आहे. यादिवश महादेव भोलेनाथाची पूजा करण्यात येते. तुमच्या घरावर कायम भगवान शंकराची कृपा बरसावी म्हणून महाशिवरात्रीपूर्वी घरात काही गोष्टी आणा.   

Feb 28, 2024, 15:40 PM IST
1/7

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा करण्यात येतो. असं म्हणतात या दिवशी भगवान महादेवाच्या दिव्य ज्योतिर्लिंगाचा जन्म झाला. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीपूर्वी घरात त्यांची आवडती वस्तू आणा.   

2/7

दिव्य शिवलिंगाची निर्मिती महाशिवरात्रीला झाली होती अशी मान्यता आहे. त्यामुळे पारा किंवा रत्नांनी बनवलेले शिवलिंग तुम्ही घरी आणू शकता. त्याची महाशिवरात्रीला विधीवत पूजा करा. यामुळे कालसर्प दोष, पितृदोष, वास्तुदोषसह अनेक दोष दूर होतात.   

3/7

शिव कुटुंबाचे फोटो किंवा मूर्ती सोमवारी किंवा महाशिवरात्रीला घरी आणा. भोलेनाथ, माता पार्वती, गणेश, कार्तिकेय आणि त्याचे सर्वात प्रिय नंदी आणि वासुकी असलेला फोटो आणा. यामुळे घरावर कायम कुटुंबाचा आशीर्वाद राहतो. आयुष्य आनंदी आनंद नांदतो. 

4/7

रुद्राक्ष भगवान शिवाला प्रिय असून तो त्यांचा दागिना सुद्धा आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाच्या अश्रूंपासून झाली अशी मान्यता आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी एक मुखी रुद्राक्ष घरी आणल्यामुळे संपत्तीत वाढ होते. 

5/7

बेलपत्राशिवाय भगवान शिवाची पूजा अपूर्ण मानली जाते. महाशिवरात्रीला तुमच्या घरी बेलपत्राचे रोप लावू भगवान शंकराला प्रसन्न करा. बेलपत्राच्या रोपाची रोज सेवा केल्याने पुण्य मिळते आणि तुमची इच्छा पूर्ण होते. 

6/7

महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही तुमच्या पूजास्थानी भगवान शिवाजवळ चांदीचे नंदीची स्थापना करा. यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदते.

7/7

महादेवला शमीची वनस्पती आवडते म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही घरी शमीचे रोप लावून त्यांची पूजा करा. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)