महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ! साताऱ्यातील कोयना धरणावर तिरंगी रोषणाई; गिरणा धरणही उजळले

77 व्या स्वातंत्र्यदिना निमित्ताने महाराष्ट्रातील मोठ्या धरणांवर आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आले. धरण परिसर तिरंगी रंगात रंगले आहे. 

वनिता कांबळे | Aug 14, 2023, 22:47 PM IST

Independe Day 2023 : देशभरात 77 व्या स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाला आहे. महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.  साताऱ्यातील कोयना धरणावर तिरंगी रोषणाई करण्यात आलेय. तर, जळगाव मधील गिरणा धरणही उजळले आहे. 

1/5

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणावर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 

2/5

धरणावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे अनेकजण येथे येवून सेल्फी घेत आहेत. 

3/5

दरम्यान सलग चार वर्षांपासून 100 टक्के भरणाऱ्या गिरणा धरणात यंदा मात्र अर्धा पावसाळा उलटून गेला तरी अवघा 34 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 

4/5

जळगावसह खान्देशला वरदान ठरलेल्या नाशिकच्या गिरणा धरणाला भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

5/5

कोयना धरणाच्या सांडव्यावर तिरांग्यातील तीन रंगाची रोषणाई आणि लेझर लाईट चा वापर करून करण्यात आलेली ही रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे.