बळीराजाचं मरण कधी थांबणार? 'या' जिल्ह्यात गेल्या 15 महिन्यात 413 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; 38 महिला शेतकऱ्यांचाही समावेश

Amaravati District Farmers Suicide Records: अमरावती जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.  हरिसाल, कोठा, कोट, बोरी, नांदुरी यासारख्या भागांना पावसासह गारपिठीचा मोठा फटका बसला होता. अशातच आता अमरावतीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे

Apr 07, 2023, 13:01 PM IST
1/6

maharashtra farmer

अवकाळी पाऊस, दुष्काळ, कर्जबारीपणा यासारख्या विविध कारणांमुळे देशासह राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच असल्याचे समोर आले आहे.   

2/6

unpredictable rain farmer

काही दिवसांपूर्वीच येऊन गेलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल केलं असतानाच एक चिंतेची बातमी समोर आली आहे. 

3/6

amravati farmer

अमरावती जिल्ह्यात गेल्या 15 महिन्यात 413 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 413 शेतकऱ्यांमध्ये 38 महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे.

4/6

mens farmer

पुरुष शेतकऱ्यांच्या पाठोपाठ आता महिला शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

5/6

unpredictable rain

अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे पिकांचे होणारे नुकसान आणि कर्जबाजारीपणा यासारख्या कारणांमुळे शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत आहे.

6/6

amravati farmer

पिकांना योग्य भाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.