उत्तरेकडील हिमवादळामुळं राज्याच्या 'या' भागात पुन्हा किमान तापमानात घट

Maharashtra Weather News : आता मात्र हवामानात पुन्हा बदल झाले असून, हे बदल नेमके कोणते आहेत ते पाहून घ्या. कारण, फिरायला जाण्याचा बेत आखत असाल तर ही माहिती तुम्हाला मोठी मदत करेल. 

Feb 21, 2024, 09:44 AM IST

Maharashtra Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये हवामानात बदल झाले असून, आता याच हवामान बदलांचे परिणाम महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. काही दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 

1/7

हवामान वृत्त

Maharashtra Weather temperature might drop down latest updates

राज्यातील कोणत्या भागात नेमकं कसंय हवामान? पूर्वानुमान पाहिलं का?   

2/7

महाराष्ट्र

Maharashtra Weather temperature might drop down latest updates

Maharashtra Weather News : राज्यातील मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आणि अनेक भागांमध्ये उन्हाचा दाह जाणवण्यास सुरुवात झाली. दुपारच्या वेळी तर उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या.

3/7

अवकाळीची माघार

Maharashtra Weather temperature might drop down latest updates

जिथं राज्याच्या काही भागांमध्ये म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळीनं धुमाकूळ घातला होता तिथंच आता ढगांचं सावट असणार आहे. 

4/7

मध्य महाराष्ट्र

Maharashtra Weather temperature might drop down latest updates

मध्य महाराष्ट्र मात्र या साऱ्याला अपवाद असेल. कारण, इथं किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसणार आहे. इथं आकाश निरभ्र राहणार असून, बोचरी थंडी अडचणी वाढवताना दिसणार आहे. 

5/7

तापमानाचा आकडा

Maharashtra Weather temperature might drop down latest updates

राज्यातील कमाल तापमानाचा आकडा 35 अंशांवर राहणार असून, उच्चांकी आकडा 37 अंशांपर्यंतही पोहोचू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

6/7

तापमानात चढ उतार

Maharashtra Weather temperature might drop down latest updates

अतीव उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी वाढत असतानाच आणि काही भागांमध्ये हिमवादळ येत असताना राजस्थान आणि मध्य प्रदेशात मात्र तापमानात चढ उतार नोंदवण्यात येत आहेत.   

7/7

पावसाचं सावट?

Maharashtra Weather temperature might drop down latest updates

तिथं दक्षिण भारतामध्ये काही गिरीस्थानं वगळता उर्वरित किनारपट्टी भाग आणि केरळामध्ये उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तर, पूर्वोत्तर राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आयएमडीनं वर्तवली आहे.