पीएम मोदींचा महाराष्ट्रात उद्घाटनांचा धडाका, 'तब्बल 'इतक्या' कामांचं करणार उद्घाटन

PM Modi in Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. तर येत्या 5 ऑक्टोबरपासून पीएम मोदी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

राजीव कासले | Oct 01, 2024, 14:20 PM IST
1/8

पीएम मोदींचा महाराष्ट्रात उद्घाटनांचा धडाका, 'तब्बल 'इतक्या' कामांचं करणार उद्घाटन

2/8

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात उद्घाटनांचा धडाका.

3/8

5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महाराष्ट्र दौरा भरगच्च कार्यक्रमांचा असणार आहे.

4/8

मुंबई, ठाणे आणि वाशिम इथल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

5/8

मुंबईमध्ये मेट्रोच्या एका टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.

6/8

तर वाशिम इथल्या पोहरा देवी इथं नगर भावनाचं लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे.

7/8

ठाणे या एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होण्याची शक्यता आहे.

8/8

दरम्यान अमित शाह देखील दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. नवी मुंबई आणि मुंबईतील विधानसभेच्या जागांचा आढावा अमित शाहा घेणार आहे.. तसेच कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहे.. मुंबईतील कमी मताधिक्य असणाऱ्या जागांचा शाह आढावा घेणार आहेत..