तुझ्या गळा, माझ्या गळा... जयंत पाटील आणि सुनील तटकरेंच्या विधानभवनातील 'त्या' फोटोची चर्चा

Maharashtra Politics : विधीमंडळ अधिवेशनाचा दुसरा आठवडाही शेती, पावसामुळे झालेलं नुकसान यामुळे वादळी होण्याची शक्यता आहे. पावसामुळे विदर्भात झालेलं नुकसान, शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी विरोधक लावून धरणार आहेत. मणिपूर मुद्द्यावरून पुन्हा विरोधक आक्रमक होतील अशी शक्यता आहे. निधीवाटप यावरून विरोधी पक्ष सरकारला घेरणार अशी शक्यता आहे. 

| Jul 24, 2023, 13:55 PM IST
1/5

 राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. दरगडग्रस्त भागताली नागरिकांचं पुनर्वसन, शेतकऱ्यांचं नुकनसान, निधी वाटप, त्र्यंबकेश्वर वाद या मुद्द्यांवर विरोधकांनी राज्य सरकारला घेरलंय. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आज राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. हातात टाळ आणि डोक्यावर वारक-यांची टोपी परिधान करत विरोधक विधानभवनाच्या पाय-यांवर जमले होते...

2/5

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने काही आमदार सरकारच्या समर्थात काही आमदार विरोधात दिसतायत. विधानसभेत जरी हे आमदार एकमेकांविरोधात उभे ठाकले असले तरी विधानसभेच्या बाहेर मात्र ते आजही जुने सहकारी आणि मित्रच आहेत.  

3/5

राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन गटांमधील कट्टर विरोधकांची गळाभेट विधान भवन परिसरात लक्षवेधी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात सध्या टोकाचे राजकीय मतभेद आहेत.

4/5

मात्र विधानभवनात दोघेही समोरासमोर आले तेव्हा आवर्जुन भेटले. आणि चक्का दोघांनी एकमेकांना मिठी मारली. विशेष म्हणजे दोघांमध्ये बराच वेळ चर्चांना सुरू होती. त्यामुळे विधानभवनाच्या आवारातल्या सर्वांचंच दोघांनी लक्ष वेधून घेतलं. 

5/5

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर सुनील तटकरे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. तर जयंत पाटील शरद पवारांबरोबर कायम राहिले आहेत.