कच्च्या रस्त्यांवरुन ड्रायव्हिंग, शेतात फेरी, गोसेवा अन्.. CM शिंदेंच्या गावाचे Photos पाहिलेत का?

CM Eknath Shinde Village Photos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून आपल्या साताऱ्यामधील मूळ गावी वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या गावाची झळक दाखवणारी एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. या पोस्टमध्ये शिंदे अगदी स्वत: गोल्फकार चालवण्यापासून ते शेतांची पहाणी करता दिसत आहेत. पाहूयात या भेटीतील काही खास फोटो...

Swapnil Ghangale | May 30, 2024, 14:56 PM IST
1/10

CM Eknath Shinde Mahabaleshwar Taluka Dare Gaon Village Photos

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरेगावात मुक्कामी आहेत. त्यांनी आपल्या गावातूनच एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये त्यांच्या गावात कशाकशाची शेती आहे याची माहिती दिली आहे.

2/10

CM Eknath Shinde Mahabaleshwar Taluka Dare Gaon Village Photos

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 

3/10

CM Eknath Shinde Mahabaleshwar Taluka Dare Gaon Village Photos

मंगळवारी ते दरे या त्यांच्या मुळगावी दाखल झाले होते. यावेळी गावात असतानाचं त्याचे वेळापत्रक कसे होते. याची एक झलक त्यांनी व्हिडिओतून दाखवली आहे. 

4/10

CM Eknath Shinde Mahabaleshwar Taluka Dare Gaon Village Photos

परदेशी कशाला जायाचं.. गड्या आपला गाव बरा.. शेत पिकाची दुनिया न्यारी.. वसे जिथे विठूरायाची पंढरी... लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला, असं शिंदेंनी ही पोस्ट करताना म्हटलं आहे.

5/10

CM Eknath Shinde Mahabaleshwar Taluka Dare Gaon Village Photos

यावेळेस शिंदे यांनी स्वत: कच्च्या रस्त्यांवरुन गोल्फकार चालवत प्रवास केला.

6/10

CM Eknath Shinde Mahabaleshwar Taluka Dare Gaon Village Photos

या भेटीदरम्यान, शिंदेंनी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली.   

7/10

CM Eknath Shinde Mahabaleshwar Taluka Dare Gaon Village Photos

मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या गावी गोसेवाही केली. त्यांनी गुरांना खाऊ घातलं.

8/10

CM Eknath Shinde Mahabaleshwar Taluka Dare Gaon Village Photos

जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले, असंही शिंदे म्हणाले.  

9/10

CM Eknath Shinde Mahabaleshwar Taluka Dare Gaon Village Photos

शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी मुख्यमंत्री शिंदेंनी केली.  

10/10

CM Eknath Shinde Mahabaleshwar Taluka Dare Gaon Village Photos

इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते, असं या पोस्टच्या शेवटी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.