महाराष्ट्राच्या राजकारणात भाईगिरी! ठाकरे, पवार आणि राणे घराण्यातील भाऊ भाऊ निवडणुकीच्या रिंगणात

 प्रत्येक निवडणुकीची काही वैशिष्ट्ये असतात, यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भावा भावांच्या जोड्या उतरल्या आहेत.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घराणेशाहीची सरशी पाहायला मिळत आहे.

| Oct 30, 2024, 23:03 PM IST

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्राला मोठ्या राजकीय घराण्यांची परंपरा राहिलीय...  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री राहिलेल्यांच्या पुढच्या पिढ्याही राज्याच्या राजकारणात सक्रिय होताना दिसतंय... काहीजण याआधी आमदार राहिले आहेत, तर काही नवीन चेहरे पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावत आहेत. यामध्ये भावा भावांच्या काही जोड्या रिंगणात उतरल्यात..  

1/9

कोकणातील दिग्गज राजकीय घराणे म्हटलं तर राणे यांच्या कुटुंबांचं नाव घ्यावं लागेल.. नारायण राणे यांच्या कुटुंबातील निलेश राणे हे मालवण कुडाळमधून शिवसेनेच्या चिन्हावर तर नितेश राणे हे कणकवलीमधून भाजपकडून निवडणुकीत उतरले आहेत.. 

2/9

काका विरुद्ध पुतण्या हा राजकारणातील संघर्ष बीड जिल्ह्यामध्ये नवीन नाही. बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये जयदत्त क्षीरसागर काका विरुद्ध संदीप क्षीरसागर पुतण्या असा 2019 मध्ये सामना पाहायला मिळाला. आता दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर यांनीही बंडाचं निशाण फडकावलंय.. त्यामुळे दोन पुतणे काकांच्या विरोधात असं चित्र निर्माण झालंय.

3/9

शरद पवारांच्या कुटुंबातील दोन बंधू दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून रिंगणात आहेत.. रोहित पवार हे दुस-यांदा कर्जत जामखेड मतदारसंघातून तर त्यांचे चुलत बंधू युगेंद्र पवार हे पहिल्यांदाच त्यांचे काका अजित पवार यांच्या विरोधात बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यांच्या निवडणुकीकडे राज्याच लक्ष लागलंय..

4/9

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कुटुंबातीलही दोन बंधू निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पुसद मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार इंद्रनिल नाईक तर त्यांच्याविरोधात बंधू ययाती नाईक यांनी अपक्ष उतरण्याचे दंड थोपटलेत. 

5/9

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात कुणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत पहिल्यांदा आदित्य ठाकरेंनी वरळीतून निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते.. आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरे हे रिंगणात आहेत.. तर त्यांचे चुलत भाऊ अमित राज ठाकरे हे पहिल्यांदाच माहिम मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावत आहेत..

6/9

चांदवड महायुती - डॉ राहुल आहेर ( भाजप ) महाविकास आघाडी - शिरीषकुमार कोतवाल ( काँग्रेस ) अपक्ष - केदा आहेर ( बंडखोर 

7/9

उत्तर महाराष्ट्रातील दिग्गज राजकारणी असलेल्या गावित कुटुंबातील तीन बंधू वेगवेगळ्या मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षांकडून आपलं नशीब आजमावत आहेत.. यामध्ये नंदुरबारमधून विजयकुमार गावित, शहादामधून राजेंद्रकुमार गावित तर नवापूर मतदारसंघातून शरद गावित हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत..

8/9

मराठवाड्यात सुद्धा घराणेशाही पहायला मिळत आहे.. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख हे लातूर शहरमधून तर धीरज देशमुख हे लातूर ग्रामीणमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.. देशमुख बंधू हे दुस-यांदा आपलं नशीब आजमावत आहेत..  

9/9

सोबतच बीडमध्ये दिग्गज राजकारणी असलेले क्षीरसागर कुटुंब.. या घरातील भाऊ भाऊ एकमेकांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात आहेत.. बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तर योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेत...