'...तर दिल्लीतलं कुबड्यांचं सरकार कोसळू शकतं'; राऊतांनी मांडले 12 मुद्दे! म्हणाले, 'भाजपचे लोक...'

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान काय घडत आहे? या निवडणुकीनंतर राज्यात काय घडणार यासंदर्भातील काही अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केले आहेत. राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात...

| Oct 27, 2024, 08:07 AM IST
1/13

rautshivsena

संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात 12 भाकितं व्यक्त केली आहेत. यात भाजपा काय काय करु शकते हे सांगतानाच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सूचक इशारा राऊतांनी दिलाय. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...

2/13

rautshivsena

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरातून सध्याच्या निवडणुकीमध्ये काय चित्र दिसत आहे? तसेच या निवडणुकीमध्ये काय काय घडू शकतं याबद्दलचे 12 मुद्दे मांडलेत. हे मुद्दे कोणते ते पाहूयात...

3/13

rautshivsena

राजकारणी आपली विश्वासार्हता गमवत आहेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

4/13

rautshivsena

भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा या निवडणुकीत ओतला जाईल, असंही राऊत म्हणालेत. 

5/13

rautshivsena

तसेच, महाराष्ट्राच्या निवडणुकीची सूत्रे गुजरातच्या हाती गेली आहेत. असे कधीच घडले नव्हते, असं राऊत यांचं म्हणणं आहे. 

6/13

rautshivsena

राऊत यांच्या दाव्यानुसार, महाराष्ट्राची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, पण याबाबत फारसा संताप दिसत नाही.

7/13

rautshivsena

महायुतीतील प्रमुख नेत्यांत ‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय लाटण्याची धडपड सुरू आहे, पण फक्त 1500 रुपये महिना या भावात बहिणींची मते मिळतील हा भ्रम तुटेल. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण? शिंदे, फडणवीस की अजित पवार? यावर लोकांत चेष्टा सुरू आहे, असंही राऊत म्हणाले. 

8/13

rautshivsena

भाजपचे लोक शिंदे गटाचे उमेदवार पाडतील, असा दावा राऊतांनी केला आहे. 

9/13

rautshivsena

महाराष्ट्रात मोदी-शहा विशेष लक्ष घालतील. महाराष्ट्रात पराभव झाला तर दिल्लीतील कुबड्यांचे सरकार कोसळू शकते, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

10/13

rautshivsena

हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रातही अपक्ष व लहान पक्षांच्या उमेदवारांना शिंदे-फडणवीसांकडून रसद पुरवली जाईल, अशी शक्यता राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

11/13

rautshivsena

प्रचारात लोकांचे खरे प्रश्न लांब राहतील, असं राऊत म्हणालेत.  

12/13

rautshivsena

शिंदे व अजित पवारांचे राजकीय अस्तित्व  23 नोव्हेंबरनंतर संपलेले असेल, असं राऊत म्हतण आहेत. 

13/13

rautshivsena

महाराष्ट्रात एक अतिभ्रष्ट सरकार सत्तेवर आहे व भ्रष्ट मार्गाने सत्ता राखण्याच्या प्रयत्नात आहे.  हे घडता कामा नये, अशी अपेक्षा राऊतांनी व्यक्त केली आहे.