Madhuri Dixit : धक-धक गर्लचं 'या' अभिनेत्यांसोबत होतं अफेयर, एका क्रिकेटपटूसोबत लग्नाची चर्चा, मग अचानक आला ट्विस्ट

Madhuri Dixit Birthday : माधुरी दीक्षित 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जातं. होती. तिच्या अभिनय आणि नृत्याने तिने चाहत्यांना वेड लावलं होतं. आजही तिची ही जादू कायम आहे. अभिनयासोबतच तिच्या अफेयर चर्चा त्या काळात खूप रंगल्या होत्या. 

May 15, 2023, 10:28 AM IST

Madhuri Dixit Affairs : धक धक गर्ल आणि बॉलिवूडची सुपरस्टार माधुरी दीक्षित नेने हिचा आज वाढदिवस. 35 वर्ष बॉलिवूडमधून तिने अभिनय आणि डान्सने सगळ्यांना वेड लावले. आजही तिची जादू आणि चार्म कायम आहे. बॉलिवूडमधील ही मराठी मुलगी आजही तिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करते. 

1/20

सिनेसृष्टीमध्ये एका मराठी अभिनेत्रीला सुपरस्टारचा दर्जा आजपर्यंत कुठल्याही अभिनेत्रीला मिळाला नाही. माधुरीने तेजाब, खलनायक, दिल तो पागल है यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्याच्या डान्सची जादू आजही कायम आहे. 

2/20

करिअरमधील सर्वोच्च स्थानी असणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रीय आहेत. आजही तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर तिची क्रेझ दिसून येते.   

3/20

अभिनय आणि डान्सशिवाय तिच्या लव्ह लाइफही कायम चर्चेत राहिली. माधुरीचं नाव अनेक विवाहित अभिनेत्यांशीही जोडलं होतं. अगदी तिच्यावर घर तोडल्याचा आरोपही त्या काळात लागले होते. 

4/20

एवढंच काय तर माधुरी दीक्षित एका भारतीय क्रिकेटपटूच्या प्रेमात इतकी वेडी होती की, त्याच्यासाठी ती काही पण करायला तयार होती. अगदी त्यांचा लग्नाची चर्चाही झाली होती. पण ही लव्हस्टोरी अधुरी राहिली. 

5/20

बॉलिवूडमधील करिअरच्या सुरुवातीलाच माधुरी आणि संजय दत्त यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. या दोघांनी अनेक चित्रपटामध्ये काम केलं. साजन, ठाणेदारमधील 'Tamma Tamma Loge' हे गाणं तर खूप हिट झालं होतं. 

6/20

संजय दत्त हा विवाहित असल्याने माधुरीवर या प्रेमप्रकरणामुळे खूप टीका सहन करावी लागली होती. अगदी त्यांचा लग्नाची चर्चाही रंगली होती. पण संजय दत्तचं नाव बॉम्बस्फोट प्रकरणात आलं आणि ही प्रेम कहाणी इथेच थांबली. 

7/20

चित्रपटसृष्टीमध्ये तिने अनेक अभिनेत्यांसोबत कामं केल. त्यातील सर्वात लोकप्रिय ठरल्या त्या म्हणजे माधुरी-संजय दत्त, माधुरी सलमान खान, माधुरी अनिल कपूर...

8/20

सिनेसृष्टीच्या सूत्रांनुसार माधुरी आणि अनिल कपूरची जी केमिस्ट्री पडद्यावर दिसतं होती. ती एकत्र काम करुन नंतर ऑफ स्क्रीनही दिसायला लागली.  

9/20

अनिल कपूर आणि माधुरीने तब्बल 18 चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यामुळे पडद्यावरील या जोडीला प्रत्यक्ष पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती.   

10/20

त्यांच्यामधील जवळीक दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही तरी सुरु आहे अशा अफवा उडायला लागल्या. त्यांच्या या प्रेम प्रकरणावर माधुरी किंवा अनिल कपूर या दोघांनीही कधीच भाष्य केलं नाही.

11/20

त्यात काळात भारतीय क्रिकेट संघात एक खेळाडूंने मुलांना वेड लावलं होतं. या खेळाडूंच्या प्रेमात अनेक अभिनेत्री पडल्या होत्या. त्यातील एक नाव होतं माधुरी दीक्षित

12/20

या किक्रेटपटूसाठी माधुरी दीक्षित काही पण करायला तयार होती. त्यांची ओळख झाली, प्रेमही झालं...विषय लग्नापर्यंत आला पण...

13/20

हे प्रेमप्रकरण होतं अजय जडेजा आणि माधुरीचं. एका जाहिरातीच्या वेळी त्यांची ओळख झाली आणि नंतर ते दोघे प्रेमात पडले. 

14/20

माधुरी अजय जडेजासाठी काही पण करु शकते ते एका घटनेमुळे समोर आले. झालं असं की, अजयला चित्रपटात काम करायची इच्छा होती. त्यामुळे तिने दिग्दर्शकांना त्याला संधी देण्यासाठी मागणी केली होती. 

15/20

या दोघांना लग्न करण्याची इच्छा होती, मात्र ही प्रेम कहाणी पण अपूर्ण राहिली. अजय जडेजाच्या कुटुंबियांनी या लग्नाला विरोध केला. माधुरी ही मध्यमवर्गीय घरातील असल्याने त्यांनी लग्नास नकार दिला होता. 

16/20

पुढे अजय जडेजाचं नाव मोहम्मद अझरुद्दीनबरोबर मॅच फिक्सिंगच्या आरोपमध्ये समोर आलं. या घटनेनंतर माधुरी दीक्षितच्या कुटुंबियांनीही या लग्नाला विरोध केला. या धक्कातून सावरण्यासाठी म्हणून की काय माधुरी अमेरिकेला निघून गेली अशी चर्चा झाली.

17/20

पुढे माधुरीच्या आयुष्यात चौथा व्यक्तीची एन्ट्री झाली. अमेरिकेतील एका पार्टीमध्ये तिची डॉ. श्री राम नेने यांच्याशी भेट झाली. 

18/20

दोघांनी डेटिंग करायला सुरुवात केली आणि काही महिन्यांनी त्यांनी या नात्याला लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला.

19/20

भारतात येऊन तिने हातातील काम पूर्ण केली आणि अचानक लग्न करुन बॉलिवूडसह चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. 

20/20

लग्नानतंर माधुरी फिल्मी दुनिया सोडून अमेरिकेत स्थायिक झाली होती. आता ती पुन्हा भारतात परतली आणि चित्रपटातसृष्टी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. तिला दोन मोठे मुलं आहेत.