पाऊस आणि भजी... बेस्ट कॉम्बिनेशन; घरच्या घरी भजी बनवण्याची बेस्ट रेसिपी

पावसाळ्यात बाहेरुन भजी विकत घेण्यापेक्षा  घरच्या घरी सोप्या पद्घतीने आठ प्रकारच्या भजी नक्की ट्राय करा.   

Jun 30, 2024, 19:22 PM IST

पावसाळा म्हटलं की अनेकांना कांदा भजी, वडापाव खाण्याचा मूड होतो. मात्र बऱ्याचदा बाहेरील खाद्यपदापर्थ हे चांगल्या प्रतिचे नसल्याने आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. 

1/8

मिर्ची भजी

हिरव्या जाड मिरच्यांची भजी अनेकांच्या आवडीची आहे. बेसनमध्ये कुरकुरीत तळली जाणारी ही भजी खास राजस्थानचं वैशिष्ट्यं आहे. पावसाचा आनंद दुप्पट घेण्यासाठी तुम्ही घरच्या घरी मिरचीची भजी करु शकता. 

2/8

मुग भजी

दिल्लीत या भजीला राम लड्डू असं म्हणतात. मुगाच्या डाळीत चिंच आणि हिरव्या मिरचीची चटणी टाकून भजीचं पीठ तयार करतात. त्यानंतर याचा गोलाकार आकार करुन तेलात तळले जातात. 

3/8

कांदा भजी

पावसाळ्यात कांदा भजी खाणं म्हणजे स्वर्गसुख असतं. वाफाळता चहा आणि घरी तयार केलेली कांदा भजी खाण्याला अनेकांची पसंती असते. 

4/8

भोपळ्याची भजी

लाल भोपळ्याचे छोटे काप करुन ते बेसन आणि मसाल्यात घोळवून घ्या. चवीपुरत मीठ टाकून तेलात तळून घ्या. ही भजी मिरच्या आणि टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता.  लाल भोपळ्याची तिखट भजी बंगालमध्ये लोकप्रिय आहे.   

5/8

कांचन फुलाची भजी

पावसाळ्यातील रानभाजी म्हणून कांचन फुलाची भाजी आणि भजी देखील केली जाते. खास बिहारमध्ये ही भजी लोकप्रिय आहे. ही फुलं बेसनमध्ये घोळवून घ्या. त्यानंतर तेलात तळून घ्या.  पुदिन्याच्य़ा चटणीसोबत ही कुरकुरीत भजी खायला अनेकांना आवडतं.    

6/8

ब्रेडची भजी

या भजीला दिल्लीमध्ये ब्रेड पकोडा असं म्हणतात. ब्रेड, लाल तिखट आणि बेसनात घोळवून घ्या.त्यानंतर तेलात कुरकुरीत तळून घ्या. ही पकोडे तुम्ही बटाट्याची भाजी किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता.   

7/8

मद्दुर वडा

कर्नाटकात मेदुर वडा नाश्त्याला खाल्ला जाणारा पदार्थ आहे. तांदळाचं पीठ, खोबऱ्याचं वाटण, रवा, मैदा आणि कढीपत्ता एकत्र करुन त्याच्या वड्या पाडल्या जातात. त्यानंतर ते तेलात खरपूस तळतात. खास पावसाळ्यात ही डीश एकदा तरी नक्की करुन पाहा.

8/8

बटाटा वडा

पावसाळ्यात गरमा गरम वडापाव खाण्याला मुंबईकर आणि पुणेकर कायमच पसंती देतात. गोड चटणी आणि हिरवी मिरचीसेबत वडापाव खाण्याची मजा असते.