Virat Kohli आणि Rohit Sharma मध्ये बिनसलं! मोठा खुलासा, "दोघेही रुममध्ये..."

विराट कोहली (Virat Kohli) मैदानातील आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. यावरुन अनेकदा कोहलीला टीकेचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र शांत स्वभावाचा आहे. या दोघांमध्ये वाद झाल्याच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत. दरम्यान यासंबंधी मोठा खुलासा झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना दोन्ही खेळाडूंना रुममध्ये बोलावून बैठक घ्यावी लागली होती.   

Feb 04, 2023, 15:25 PM IST
1/7

विराट कोहली (Virat Kohli) परखडपणे आपली मतं मांडण्यासाठी ओळखला जातो. मैदानावरही त्याच्या आक्रमक स्वभावाची झलक दिसत असते. यामुळे विराट कोहली अनेकांच्या निशाण्यावर असतो. रोहित शर्मासोबत त्याचा वाद झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. पण दोघांन नेहमीच हे वृत्त नाकारलं आहे. (AFP)  

2/7

आता कोहली आणि रोहितमधील वादासंबधी मोठा खुलासा झाला आहे. माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांनी आपलं पुस्तक 'कोचिंग बियॉन्ड'मध्ये (Coaching Beyond) याचा उल्लेख केला आहे. 2019 वर्ल्डकपनंतर या वादाने जोर धरला होता आणि त्यानंतर रवी शास्त्री यांना मध्यस्थी करावी लागली होती असं त्यांनी सांगितलं आहे. (AFP)  

3/7

आर श्रीधर यांनी लिहिलं आहे की, 2019 वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवानंतर सर्वजण निराश होते. ड्रेसिंग रुमसंबंधी अनेक चर्चा सुरु होत्या. रोहित कँप आणि विराट कँप अशी चर्चा सुरु असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं होतं. इतकंच नाही, तर दोघांनी सोशल मीडियावर एकमेकाला अनफॉलो केलं होतं. (AFP)  

4/7

श्रीधर यांनी सांगितलं की, जवळपास 10 दिवसांनी वेस्ट इंडिजविरोधात टी-20 मालिका खेळण्यासाठी आम्ही अमेरिकेत पोहोचलो होतो. यावेळी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तात्काळ विराट आणि रोहितला आपल्या रुममध्ये बोलावलं. भारतीय क्रिकेट योग्य पद्धतीने खेळलं जावं यासाठी तुम्हा दोघांमध्ये एकमत असणं गरजेचं आहे असं शास्त्री यांनी दोघांना सांगितलं. (AFP)  

5/7

शास्त्री यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माला समजावताना सांगितलं की, सोशल मीडियावर जे काही झालं ते सर्व ठीक आहे. पण तुम्ही दोघे वरिष्ठ खेळाडू आहात. त्यामुळे हा वाद बंद झाला पाहिजे. हे सर्व तुम्ही मागे सोडावं अशी माझी इच्छा आहे. पुढे जाण्यासाठी आपल्याला एकजूट व्हावं लागेल. (AFP)  

6/7

रवी शास्त्री यांनी समजूत घातल्यानंतर गोष्टींमध्ये सुधारणा झाली. श्रीधर यांनी लिहिलं आहे की, रवी शास्त्री यांची मध्यस्थी निर्णायक ठरली. (AFP)  

7/7

2021 टी-20 वर्ल्डकपनंतर कोहलीने टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. यानंतर बीसीसीआयने त्याला वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुनही हटवलं होतं. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरधात झालेल्या पराभवानंतर विराटने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. यानंतर रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद मिळालं होतं. (AFP)