Jasprit Bumrah: आलिशान घर, कार कलेक्शन...; किती कोटींच्या संपत्तीचा मालक आहे बुमराह?

Jasprit Bumrah Net Worth: टीम इंडियाचे काही खेळाडी आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. यामध्ये जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे. 

Surabhi Jagdish | May 28, 2024, 12:38 PM IST
1/7

टीम इंडियाचा नंबर 1 गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराहचं नाव घेतलं जातं. जसप्रीत बुमराह जितक्या कमालीचा गोलंदाज आहे, तितकीचं त्याचं नेटवर्थ देखील कमालीचं आहे. 

2/7

जसप्रीत बुमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या कमाईत मोठी तफावत आली आहे. 

3/7

2018 मध्ये त्याच्या आयपीएलच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली होती. 2018 मध्ये त्याला एका हंगामासाठी 7 कोटी रुपये मिळत होते.

4/7

मात्र, तो आता एका हंगामात 12 कोटी रुपये घेत आहे. त्याने 2013 ते 2023 दरम्यान IPL मधून अंदाजे 56 कोटी रुपये कमावले आहेत.

5/7

जसप्रीत बुमराहने क्रिकेटमधून प्रसिद्धी मिळवली असून आता तो वेगवेगळ्या कंपन्यांच्या जाहिरातीतून देखील कमाई करतो. बुमराह झेप्टो, ड्रीम 11 सह अनेक कंपन्यांचा चेहरा असून रिपोर्ट्सनुसार, तो एका दिवसाच्या एंडोर्समेंटसाठी 1.5 ते 2 कोटी रुपये घेतो.

6/7

जसप्रीत बुमराहचं मुंबई आणि अहमदाबादमध्ये घर आहे. त्यांच्या मुंबईतील घराची किंमत 2 कोटी रुपये तर अहमदाबादमधील घराची किंमत 3 कोटी रुपये आहे. याशिवाय बुमराहकडे मर्सिडीज मेबॅच एस560, निसान जीटी-आर, रेंज रोव्हर वेलार, टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि ह्युंदाई वेर्ना आहेत. 

7/7

रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराहची 2023 मध्ये एकूण संपत्ती $7 दशलक्ष म्हणजे 55 कोटी रुपये आहे.