PHOTO : मधुबाला-मुमताजसोबत प्रेम, दोन विवाह; अशी होती शम्मी कपूर यांची प्रेम कहाणी, दुसऱ्या पत्नीला मुलं का झाली नाहीत?

Shammi Kapoor Birthday : कोई मुझे जंगली कहे...शम्मी कपूर भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात मनोरंजक अभिनेता म्हणून आजही आपली ओळख कायम ठेवली आहे. सुपरस्टारने 1953 मध्ये आलेल्या जीवन ज्योती आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांच्या जबरदस्त अभिनय कारकिर्दीत, त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 

| Oct 21, 2024, 13:03 PM IST
1/17

चित्रपटासोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नव्हतं. बॉलिवूडचा एल्विस प्रेस्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शम्मी कपूर यांची आज जयंती आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आजही चाहत्यांना माहिती नाही. 

2/17

21 ऑक्टोबर 1931 मुंबईत जन्मलेले दिग्गज शम्मी कपूर यांचं खरं नाव हे शमशेर राज कपूर असं होतं. पण भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि आई रामशरणी कपूर त्यांचं नाव शम्मी कपूर असं ठेवलं. 

3/17

हे फार कमी लोकांना माहितीय की, शम्मी कपूर यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी, त्यांचं बालपण कलकत्तामध्ये गेलंय. अभिनेत्याने आपले मॉन्टेसरी शिक्षण आणि बालवाडी या शहरात पूर्ण केलंय. कारण त्यावेळी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर कलकत्ता येथील न्यू थिएटर्स स्टुडिओमध्ये काम करत होते. 

4/17

पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा असूनही, तरुण शम्मी कपूरने पृथ्वी थिएटर्समध्ये कनिष्ठ कलाकार म्हणून काम तर केलंय. शिवाय मासिक पगारावर 50 रुपये घेऊन त्यांनी त्या काळात एक धाडसी आणि प्रेरणादायी पाऊल उचलले होतं. त्यानंतर चार वर्षे संघर्षानंतर 1952 मध्ये त्यांना मासिक पगार हा 300 झाला. 

5/17

त्यांच्या लव्ह लाइफबद्दल बोलायचं झालं तर, त्यांचं पहिलं प्रेम अभिनेत्री नूतन होत्या. शम्मी कपूर आणि नूतन एकमेकांचे शेजारी असल्याने एकत्र लहानाचे मोठे झाले. शम्मी आणि नूतन त्यांच्या लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांच्या कुटुंबियांचंही एकमेकांशी घट्ट नातेसंबंध होते. पण नूतनने त्यांच्या आईला शम्मीबद्दल सांगितलं असता, त्यांनी नकार दिला आणि नूतन यांना अभ्यासासाठी स्वित्झर्लंडला पाठवलं. असं त्यांच्या बालपणीच्या प्रेमकथेचा अंत झाला.

6/17

IMDB नुसार, शम्मी कपूरचे वय 20 वर्षांपेक्षा थोडे जास्त तेव्हा ते मधुबालाच्या प्रेमात पडले. त्यांना तिच्याशी लग्न करायचे होते. मधुबाला यांच्या आईने शम्मी यांना सांगितले की, तू हिंदू आणि मधुबाला मुस्लिम आहे, त्यामुळे हे लग्न शक्य नाही. मधुबाला आणि शम्मी यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं.

7/17

मधुबालानंतर त्यांच्या आयुष्यात अजून एक तरुणी आली. 1953 मध्ये शम्मी कपूर आणि त्यांचे भाऊ राज कपूर, शशी कपूर क्रिकेट सामना पाहण्यासाठी श्रीलंकेला गेले होते. एके दिवशी, त्यांच्या मुक्कामादरम्यान, शम्मी कपूरने त्यांच्या हॉटेलमध्ये कॅबरे परफॉर्मन्स पाहण्याचे ठरवले होते. तिथेच त्यांची भेट नादिया गमाल हिच्याशी झाली, जी त्यावेळी जगातील सर्वोत्कृष्ट कॅबरे परफॉर्मर होती.

8/17

तिच्या सौंदर्याने शम्मी कपूर घायाळा झाले.  22 वर्षीय शम्मी कपूर यानी नादिया गमालच्या प्रेमात पडले.  त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर ती म्हणाली की, ती खूपच लहान असल्याने त्यांच्यामध्ये पाच वर्षे वाट पाहावी लागेल आणि जर प्रेम असेच राहिले तर ती नक्कीच त्याच्याशी लग्न करेल. दोघांनी संपर्कात राहण्याचे आश्वासन दिलं आणि शम्मी कपूर भारतात परतले. पण परतल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आणि श्रीलंकेत काय झाले ते श्रीलंकेतच राहिलं. 

9/17

24 ऑगस्ट 1955 रोजी मुंबईतील बाणगंगा मंदिरात शम्मी कपूर आणि गीता बाली यांचा अचानक लग्न केलं. 1956 आणि 1961 मध्ये, शम्मी कपूर आणि गीता बाली अनुक्रमे आदित्य राज कपूर आणि कांचन कपूर यांचा जन्म झाला. पण दुःखाची गोष्ट म्हणजे गीता बाली यांचं 21 जानेवारी 1965 रोजी निधन झालं. 

10/17

गीता बालीच्या मृत्यूनंतर शम्मी हे बिना रमानी यांच्यावर फिदा झाले होते. काही काळानंतर ते मुमताजच्या प्रेमात पडले. मुमताजने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शम्मी कपूरला तिच्याशी लग्न करायचं होतं, पण त्यांना त्यावेळी मुमताज यांना करिअर करायचं होतं. त्यामुळे मुमताज यांनी लग्नाला नकार दिला. खरंतर, त्यावेळी मुमताज खूपच लहान होत्या आणि शम्मी त्यांच्या वयाच्या दुप्पट होते. मुमताजने सांगितले की, त्यांचं नाते सुमारे दोन वर्षे टिकलं. एके दिवशी शम्मी कपूरने मुमताजला लग्नासाठी प्रपोज केले आणि सांगितलं की, कपूर कुटुंबात लग्न करणारी मुलगी बॉलिवूडमध्ये काम करू शकत नाही. हे ऐकून मुमताजने शम्मीचा प्रस्ताव नाकारला.

11/17

गीता बाली गमावल्याने व्यथित झालेल्या शम्मी कपूरने 27 जानेवारी 1969 रोजी त्यांची जवळची मैत्रीण, रघुवीर सिंग यांची बहीण नीला देवी हिच्याशी लग्न केलं. नीला देवी शम्मी कपूरपेक्षा 10 वर्षांनी लहान होत्या. आता त्यांच्या आयुष्यात खऱ्या जोडीदाराची साथ मिळाली होती. 

12/17

शम्मी कपूर आणि नीला देवी यांना मूलबाळ नव्हतं आणि नीला देवी यांनी स्वतः हा निर्णय घेतला होता. त्यामागचे कारण असे की तिला शम्मी कपूरच्या आधीच्या लग्नातील मुलांना स्वतःचं समजायचं होतं. त्यांना भीती होती की जर त्यांना मुलं झाली तर त्यांच्याकडून भेदभाव होईल.  

13/17

शम्मी कपूरचा मुलगा आदित्य याने द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत नीला देवींनी आपल्या आईच्या निधनानंतर मागे राहिलेली पोकळी कशी भरून काढली याबद्दल सांगितलं होतं.  माता कुटुंबांसाठी किती महत्त्वाच्या असतात यांचं उत्तम उदाहरण म्हणजे माझी आई गीता बाली आहेत'

14/17

भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले रॉकस्टार शम्मी कपूर हे हैदाखान बाबाचा प्रचंड अनुयायी होते. अप्रत्यक्ष लोकांसाठी, हैदाखान बाबा हे एक धार्मिक गुरु होते जे जगभरात त्यांच्या शिकवणींसाठी प्रसिद्ध होते. 1970 पासून ते 1984 मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी प्रेम आणि एकतेचा संदेश दिला.  

15/17

शम्मी कपूर यांना 'द एल्विस प्रेस्ली ऑफ बॉलिवूड' असं म्हटलं जातं. कारण शम्मी कपूर त्यांच्या नृत्याच्या स्टेप्स स्वतःच कोरिओग्राफ करत असत आणि त्यांच्या कारकिर्दीत काही प्रसंगी त्यांना स्टेप्स तयार करण्यासाठी कोरिओग्राफरची गरज भासली नाही. त्याची नृत्यशैली हॉलिवूडच्या खळबळजनक एल्विस प्रेस्लीसारखीच होती. गाणे गाताना त्यांच्या हालचालींमधील उल्लेखनीय समानतेमुळे शम्मीला 'बॉलिवूडचे एल्विस प्रेस्ली' हे टॉटल मिळालं.   

16/17

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शम्मी कपूर हे भारतातील पहिल्या ख्यातनाम व्यक्तींपैकी एक होते ज्यांनी त्या काळात इंटरनेट वापरायला सुरुवात केली. एवढंच नाही तर त्यात त्यांनी प्रभुत्व मिळवलं होतं. कारण त्यांना तंत्रज्ञानात नेहमीच उत्सुकता होती. भारतीय इंटरनेट वापरकर्ते समुदायाचा संस्थापक आणि अध्यक्ष झाल्यानंतर अभिनेत्याने त्याचे इंटरनेटचे ज्ञान एका नवीन स्तरावर नेलं होतं.   

17/17

सर्वांचे आवडते शम्मी कपूर, त्यांच्या अद्वितीय अभिव्यक्ती, अविश्वसनीय अभिनय कौशल्ये, कायम व्होल्टेज ऊर्जा आणि विलक्षण नृत्य चालींसाठी आजही ओखळले जातात, त्यांना कधीही विसरता येणार नाहीत.