55000 ची रोकड, शेतजमीन, म्युच्युअल फंडात 'इतकी' रक्कम; राहुल गांधींकडून एकूण संपत्तीचा आकडा जाहीर

Rahul Gandhi Net Asset : भाजपच्या विरोधात एल्गार पुकारणाऱ्या इंडिया आघातीलून काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. 

Apr 04, 2024, 08:53 AM IST

Loksabha Election 2024 Rahul Gandhi Wealth : देशभरात निवडणुकीचीच रणधुमाळी पाहायला मिळत असून, सत्ताधारी भाजप आणि त्याविरोधात असणारी इंडिया आघाडी यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. 

1/7

एकूण संपत्तीचा आकडा

Loksabha election 2024 rahul gandhi declared his wealth during waynad nomination latest news

 गुरुग्राममध्ये कार्यालय, म्युच्युअल फंडात 'इतकी' रक्कम; राहुल गांधींनीकडून एकूण संपत्तीचा आकडा जाहीर

2/7

वायनाड

Loksabha election 2024 rahul gandhi declared his wealth during waynad nomination latest news

याच धर्तीवर राहुल गांधी यांनी नुकताच निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज केरळच्या वायनाड मतदारसंधातून दाखल केला. निवडणुकीसाठीचा अर्ज भरत असताना त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली. ज्यामुळं आता राहुल गांधी यांच्या संपत्तीच्या आकड्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या.   

3/7

उमेदवारी अर्ज

Loksabha election 2024 rahul gandhi declared his wealth during waynad nomination latest news

निवणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना राहुल गांधी यांनी आपल्याकडे 55000 रुपये रोकड असल्याचं स्पष्ट करत आपल्या दोन्ही बँक खात्यांमध्ये मिळून 26 लाख रुपये जमा असल्याचं सांगितलं.   

4/7

मतदारांचा कौल कुणाला?

Loksabha election 2024 rahul gandhi declared his wealth during waynad nomination latest news

सीपीआय महासचिव डी राजा यांची पत्नी, एनी राजा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्याविरोधात राहुल गांधी वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2019 मध्ये ते याच मतदार संघातून सर्वाधिक 4.31 लाख मतांनी विजयी झाले होते. आता 26 एप्रिलला होणाऱ्या मतदानामध्ये राहुल गांधी यांना मतदार कौल देतात का याकडे सर्वांचं लक्ष. 

5/7

मालमत्ता

Loksabha election 2024 rahul gandhi declared his wealth during waynad nomination latest news

53 वर्षे वयाच्या राहुल गांधी यांच्याकडे 11.15 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये कार्यालयं, कृषी भूखंड आणि गैर कृषी भूखंडाचाही समावेश आहे. दिल्लीतील महरोली इथं असणाऱ्या कृषी भूखंडामध्ये प्रियंका गांधी यांचीही भागिदारी आहे. याशिवाय त्यांच्याकडे गुरुग्राम येथे एक कार्यालयहीअसून, त्याची किंमत 11 कोटी रुपये आहे. 

6/7

म्युच्यु्ल फंड

Loksabha election 2024 rahul gandhi declared his wealth during waynad nomination latest news

उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे म्युच्युअल फंड, इक्विटी, सॉवरेन गोल्ड बॉण्डसह 9.24 कोटी रुपयांची एकूण संपत्ती आहे. यामध्ये 3.81 कोटी रुपये म्युच्युअल फंडात जमा आहेत तर, ते 49.7 लाखांचं देणं लागतात.   

7/7

राहुल गांधी यांच्या नावे...

Loksabha election 2024 rahul gandhi declared his wealth during waynad nomination latest news

राहुल गांधी यांच्या नावे 18 Criminal Case असून, 2022-23 या वर्षभरात त्यांनी 1.02 कोटींची कमाई केली. ही कमाई खासदारकीचं वेतन, बँक व्याज, बॉण्ड आणि रॉयल्टीतून मिळल्याचं त्यांनी जाहीर केलं.