PHOTO : प्रसिद्ध मॉडेलपासून कर्करोगवर मात, त्यानंतर दोन मुलांना जन्म, अभिनय क्षेत्रात केली पुन्हा एन्ट्री

Birthday Special : चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी प्रसिद्ध मॉडेल असलेले या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. सर्व काही छान सुरु असताना कर्करोगाशी सामना...ही लढाईही तिने जिंकली. त्यानंतर दोन मुलांना तिने जन्म दिला. एवढंच नाही तर तिने अभिनय क्षेत्रात पुन्हा दमदार एन्ट्री केली. 

Apr 04, 2024, 08:27 AM IST
1/8

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी तिने करिअरला सुरुवात केली. यशस्वी मॉडेलिंगनंतर तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. पहिल्यांदा टीव्ही स्क्रीनवर ती बॉम्बे डाईंगच्या जाहिरातीमध्ये झळकली. 

2/8

शशी कपूरचा मुलगा करण कपूरसोबत तिच्या लूकने सगळे अवाक् झाले. त्यानंतर ग्लॅड रॅग्सच्या कव्हर पेजवर लाल स्विम सूटमध्ये तिचं सौंदर्य पाहून सगळे घायाळ झाले. आम्ही कोणाबद्दल बोलतोय तुम्हाला कळलं असेल. 

3/8

लिसा रे तिचं आयुष्य एका चित्रपटाच्या कथेसारखं आहे. बंगाली कुटुंबातील लिसाचा जन्म 4 एप्रिल 1972 ला टोरंटो कॅनडामध्ये झाला. 

4/8

2009 मध्ये टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलदरम्यान लिसाने सर्वांना जोरदार धक्का दिला. मल्टीपल मायलोमा नावाच्या कर्करोगाने तिला गाठल्याचं तिने जाहीर केलं. यातून ती परतेल असं कोणालाही वाटलं नाही, पण तिने ही लढाई जिंकली. 

5/8

नेताजी या तमिळ चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नुसरत फतेह अली खानच्या आफरीन या म्युझिक व्हिडीओने तिचं नशीब पालटलं. 

6/8

कसूर, वॉटर या चित्रपटाने तिला नवीन ओळख दिली. कॅनडा, युरोप आणि यूएसएच्या चित्रपटांमध्येही तिनं काम केलं. 

7/8

कॅन्सरवर मात केल्यानंतर तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले. 2012 मध्ये तिचा बॉयफ्रेंड जेसन डेहनीसोबत तिनं लग्न केलं. 2018 मध्ये ती सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलींची आई झाली.

8/8

2015 मध्ये रिलीज झालेल्या 'इश्क फॉरएव्हर' या चित्रपटाद्वारे तिने पुन्हा एन्ट्री केली. त्यानंतर ती ओटीटी जगात फोर मोअर शॉट्स प्लीज' यात दिसली.