भारतातील पहिल महागडं घर अंबानी यांचं, दुसरं कुणाच, माहित आहे का?

गौतम सिंघानिया यांचे घर हे मुकेश अंबानी यांच्या घरा इतकेच महागडे आहे.

Nov 27, 2023, 17:08 PM IST

gautam singhania JK House:  रिलायन्स उद्योग (Reliance) समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वात मोठे आणि नामवंत उद्योगपती (Businessmen) आहेत. अंबानी यांचे मुंबईतील  ‘अँटिलिया’ (Antilia) घर हे भारतातील पहिल महागडं घर आहे. फॅब्रिक उत्पादक रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया यांचे घर हे  भारतातील दुसरं महागडं घर आहे. 

1/7

अंबानी यांचे मुंबईतील अँटिलिया हे घर 27 मजली इमारत आहे. तब्बल 4 लाख स्क्वेअर फूटमध्ये हे घर बांधले आहे. 

2/7

JK House मध्ये मोठा सर्व्हिस हॉल, स्विमिंग पूल, स्पा, हेलिपॅड तसेच सर्व सोई सुविधा आहेत. 

3/7

सिंघानिया यांची JK House ही इमारत पहिली फक्त 14 मजल्यांची होती. नंतर एकूण 37 मजले बांधण्यात आले. तिसर्‍या मजल्यापासून चौदाव्या मजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.   

4/7

 मुंबईच्या ब्रीच कँडी भागात 37 मजली इमारात सिंघानिया यांचे घर आहे. या घराती किंमत 6 हजार करोड रुपये इतकी आहे. 

5/7

 भारतातील दुसरं महागडं घर ब्रिक उत्पादक रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया यांचे आहे. जे के हाऊस असे या घराचे नाव आहे.  

6/7

अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीत पहिले सहा मजले पार्किंगसाठी आहेत. 168 वाहने येथे पार्क करु शकतो. याशिवाय 9 लिफ्ट, सिनेमा हॉल, जीम, योगा स्टुडिओ, स्विमिंग पूल, स्पा आणि मंदिर देखील आहे. 

7/7

अंबानी यांच्या अँटिलिया या घराची किंमत 2 बिलियन डॉलर्सच्या जवळपास आहे. जवळपास 600 लोक येथे काम करतात.