मुलांना आईकडून मिळतं बुद्धीचातुर्य तर, वडिलांकडून...; अहवालातून समोर आली चिंताजनक माहिती

Relationship News : अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मुलांना आईवडिलांकडून नेमका कोणता वारसा मिळतो माहितीये? संपत्ती वगैरे नंतर, आधी मिळतात 'या' गोष्टी 

Feb 12, 2024, 12:58 PM IST

Relationship News : एखादं मुल जन्माला आलं की काही महिन्यांत त्या बाळाच्या सवयी आणि एकंदर हालचाली पाहून 'हा बाबांवर गेलाय', 'ही अगदी आईसारखीच आहे' हे असं हमखास म्हटलं जातं. 

1/7

तुझा स्वभाव....

lifestyle relationship kids gets brilliant mind from mother and more stress from father latest update

लहानपणीच नव्हे, तर मोठं झाल्यानंतरही तुम्हाला अनेकदा घरातल्या मंडळींनी 'तुझा स्वभाव आई किंवा बाबांवर गेलाय' असं बऱ्याचदा म्हटलं असेल. तुम्हाला माहितीये का ही गमतीची नाही, तर विचार करण्याजोगी बाब आहे. 

2/7

वागणुकीत झालेले बदल

lifestyle relationship kids gets brilliant mind from mother and more stress from father latest update

लहापण आणि तारुण्यावस्थेतून पुढं येऊन जेव्हा घरात एखादा वाद उभा राहतो तेव्हाही वागणुकीत झालेले बदल पाहून या स्वभावावरूनही अनेक रुसवेफुगवे होतात. पण, असं नेमकं का? 

3/7

संशोधन

lifestyle relationship kids gets brilliant mind from mother and more stress from father latest update

जागतिक स्तरावर भारत, आशिया, अमेरिका, युरोपात करण्यात आलेल्या 18 संशोधनांच्या माध्यमातून या प्रश्नाच्या उत्तराची उकल झाली असून, लक्षवेधी माहिती समोर आली आहे. 

4/7

बुद्धिचातुर्याचा वारसा

lifestyle relationship kids gets brilliant mind from mother and more stress from father latest update

केम्ब्रिज विद्यापीठानं 2016 मध्ये केलेल्या अभ्यासानंतर 2024 फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेल्या ग्लासगो वैद्यकिय संशोधन परिषदेतून एक रंजक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार मुलांना त्यांच्या आईकडून बुद्धिचातुर्याचा वारसा मिळतो, तर वडिलांकडून तणावाचा. 

5/7

बुद्धिमत्ता

lifestyle relationship kids gets brilliant mind from mother and more stress from father latest update

मुलांच्या या बुद्धीमत्तेसाठी एक्स गुणसूत्र महत्त्वाची भूमिका बजावतं. महिलांमध्ये असणारी दोन्ही गुणसूत्र एक्स असल्यामुळं वडिलांच्या तुलनेत त्यांना आईकडून अधिक बुद्धिमत्ता मिळते. 

6/7

राग, घाई

lifestyle relationship kids gets brilliant mind from mother and more stress from father latest update

पुरुषांमध्ये एक्स आणि वाय अशी गुणसूत्र असतात. यामधील वाय गुणसूत्र राग, घाई आणि लहानसहान गोष्टींमधील ताणतणावास कारणीभूत ठरतो. 

7/7

वंशपरंपरागत बुद्धिमत्ता

lifestyle relationship kids gets brilliant mind from mother and more stress from father latest update

आश्चर्याची बाब म्हणजे मुलांमध्ये असणाऱ्या बुद्धीमत्तेपैकी 40 ते 60 टक्के बुद्धिमत्ता वंशपरंपरागतरित्या मिळालेली असून, शाळा, कुटुंब, आजुबाजूचं वातावरण, मित्रपरिवार या साऱ्याचा परिणाम उर्वरित टक्केवारीवर होत असतो.