लाडकी बहिण योजनेचे नियम बदलले; अर्ज भरताना त्रासदायक ठरत असलेल्या अटी केल्या रद्द

लाडकी बहिण योजनेचे नवे नियम काय आहेत जाणून घेऊया.   

| Jul 03, 2024, 19:19 PM IST

Majhi Ladki Bahin yojana:   मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांची धावाधाव होताना दिसतेय. योजनेसाठी आवश्यक असणा-या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी राज्यभरात शासकीय कार्यालयात मोठी गर्दी पहायला मिळतेय. लाडकी बहिण योजनेत अत्यंत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. अर्ज भरताना त्रासदायक ठरत असलेल्या अटी  रद्द करण्यात आल्या आहेत. 

1/9

आदिवास प्रमाणपत्राची अट शिथील करण्यात आली आहे. 

2/9

ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान मिळणार आहे. 

3/9

परराज्यातील विवाहित महिलांनाही याचा लाभ घेता येईल.

4/9

एका कुटुंबातील 2 महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

5/9

5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. 

6/9

15 वर्षापूर्वीचं रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक पुरावा दिला तरी अर्ज भरता येणार आहे. 

7/9

पिवळं, केशरी रेशनकार्ड असल्यास उत्पन्न दाखला द्यावा लागणार नाही. यामुळे यासाठी अर्ज भरताना उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही. 

8/9

आधी अर्ज भरण्यासाठी 15 जुलै पर्यंतची मुदत होती. आता मात्र 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. 

9/9

21 ते 65 वयोगटातील महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ घेता येईल.