देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन! Bank Offer मुळे मिळतोय अर्ध्या किंमतीत; पाहा तपशील

Cheapest 5G Smartphone of India: भारतामध्ये मागील काही काळापासून 5G स्मार्टफोनला मागणी वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे अगदी मेट्रो शहरांपासून ते टू आणि थ्री टियर सिटींमध्येही 5G फोनची मागणी वाढत आहे. याच वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या नवीन 5G स्मार्टफोन बाजारात उतरवताना दिसत आहेत. मात्र अनेक 5G स्मार्टफोन बजेटबाहेर असले तरी एका भारतीय कंपनीने स्वस्तात आणि परडणारा 5G स्मार्टफोन बाजारात आणला आहे. जाणून घेऊयात या स्मार्टफोनबद्दल...

| Jun 11, 2023, 16:10 PM IST
1/10

Lava blaze 5G 6GB Best Deals

परदेशी ब्रॅण्डच्या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी एक भारतीय बनवाटीचा स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. हल्ली मेड इन इंडिया आणि खास करुन भारतीय बनावटीच्या स्मार्टफोनलाही मागणी वाढत असल्याचं पहायला मिळत नाही. मात्र अनेकदा हे फोन ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत अशीही तक्रार असते. पण हा समज मोडून काढण्यासाठी लाव्हा कंपनीचा ब्लेज 5G (Lava Blaze 5G) स्मार्टफोन बाजारात आला आहे.

2/10

Lava blaze 5G 6GB Best Deals

लाव्हा ब्लेज 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच या फोनचं रेजोल्यूशन 720x1600 पिक्सल इतकं असून रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज इतकं आहे.

3/10

Lava blaze 5G 6GB Best Deals

लाव्हा ब्लेज 5G स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोअर मिडियाटेक डिमेन्स्टी 700 एसओसी चिपसेट देण्यात आला आहे.

4/10

Lava blaze 5G 6GB Best Deals

या फोनमध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅमचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळेच लाव्हा ब्लेज 5G स्मार्टफोन हँग न होता सुरळीतपणे काम करण्यासाठी अगदीच उत्तम आहे.

5/10

Lava blaze 5G 6GB Best Deals

50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर कॅमेरा आणि एक डेफ्थ कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशबरोबरच मायक्रो लेन्सही देण्यात आली आहे. 

6/10

Lava blaze 5G 6GB Best Deals

सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रण्ट कॅमेरा देण्यात आला आहे. लाव्हा ब्लेज 5G स्मार्टफोनमध्ये 3 जीबी व्हर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे.

7/10

Lava blaze 5G 6GB Best Deals

लाव्हा ब्लेज 5G स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये फिंगर सेन्सर लॉकचीही सुविधा देण्यात आली आहे.

8/10

Lava blaze 5G 6GB Best Deals

लाव्हा ब्लेज 5G स्मार्टफोनची किंमत सध्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या कोणत्याही 5G स्मार्टफोनपेक्षा फारच कमी आहे. या स्मार्टफोनची किंमत 16 हजार 345 रुपये इतकी आहे.

9/10

Lava blaze 5G 6GB Best Deals

मात्र कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोनवर अॅमेझॉनच्या वेबसाईटवर 27 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे लाव्हा ब्लेज 5G स्मार्टफोन हा केवळ 11 हजार 999 रुपयांना विकत घेता येईल.

10/10

Lava blaze 5G 6GB Best Deals

लाव्हा ब्लेज 5G स्मार्टफोन विकत घेताना त्यावर बँकांकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल. बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवरुन पेमेंट केल्यास 1 हजार रुपयांची सवलत मिळेल. तसेच हा स्मार्टफोन एक्सचेंज ऑफर आणि ईएमआयवरही उपलब्ध आहे. सर्व ऑफर्सचा विचार केला तर हा फोन जवळजवळ अर्ध्या किंमतीत विकत घेता येईल. (सर्व फोटो लाव्हाच्या वेबसाईटवरुन साभार)