Navratri Rangoli Designs Ideas: नवरात्रीचे 9 दिवस दाराजवळ काढा सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स, 5 मिनिटांत काढून होतील

Latest Navratri Designs Ideas: 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण भारतात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या दिवसात अनेक घरांमध्ये घट बसतात. संपूर्ण 9 दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण असते. नवरात्रीच्या सणात 9 दिवस दारासमोर देव्हाऱ्याच्या समोर रांगोळ्या काढल्या जातात ज्यामुळे शोभा वाढते आणि प्रसन्न वाटतं. तेव्हा या नवरात्रीत तुम्हाला झटपट काढता येतील अशा सोप्या पण सुंदर रांगोळी डिझाईन्स सांगणार आहोत. 

Pooja Pawar | Oct 03, 2024, 15:02 PM IST

 

 

1/7

दाराजवळ रांगोळी काढल्याने शोभा वाढते. झटपट पण सुंदर रांगोळ्या काढण्यासाठी तुम्ही टूथपिक, इअर बड्स, चमचा सुपाऱ्या इत्यादींचा वापरत करू शकता.   

2/7

दुकानांमध्ये लक्ष्मीच्या पावलांचे, फुलांचे रेडिमेड छाप किंवा ठसे सुद्धा उपलब्ध असतात. असे छाप वापरून तुम्ही नवरात्री निमित्त सुंदर आणि झटपट रांगोळ्या काढू शकता.  

3/7

लक्ष्मीची किंवा देवी आईची रांगोळी काढताना अनेकदा चुकते. तेव्हा यासाठी तुम्ही खडूचा वापर करून पहिले आकृती काढून घ्या आणि मग त्यामध्ये रंग भरून रांगोळी पूर्ण करा. 

4/7

नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही कळस आणि नारळ याच्या सुद्धा सोप्या आणि सुंदर डिझाइन्स काढू शकता. यांमध्ये सुंदर असे रंग भरल्यावर रांगोळी अधिकच रेखीव दिसते. 

5/7

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घराच्या उंबरठ्यावर देवीच्या पावलांच्या रोग वेगवेगळ्या रांगोळी डिझाईन्स तुम्ही काढू शकता. 

6/7

नवरात्र आणि गरबा यांचे समीकरण काही वेगळेच आहे. तेव्हा या दिवसात तुम्ही दांडिया खेळणाऱ्या महिला, पुरुष यांची सुद्धा रांगोळी काढू शकता. 

7/7

घट स्थापनेचा शुभ मुहूर्त 2024 : घट स्थापनेसाठी सकाळी 6.30 वाजेपासून ते 7.31 वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे. तर घट स्थापनेचा अभिजात मुहूर्त दुपारी 12.03 वाजेपासून ते 12.51 वाजेदरम्यान आहे. या मुहूर्तादरम्यान घट स्थापना केली जाऊ शकते