लक्ष्मीबाई ते झाशीची राणी.... सोपा नव्हता हा प्रवास

Nov 19, 2018, 16:30 PM IST
1/7

लहानपणीच मणिकर्णिका नाव देण्यात आलं

लहानपणीच मणिकर्णिका नाव देण्यात आलं

19 नोव्हेंबर 1828 मध्ये बनारसच्या एका मराठी ब्राम्हण कुटुंबात राणी लक्ष्मीबाईचा जन्म झाला. राणी लक्ष्मीबाई  यांच लहानपणी मणिकर्णिका हे नाव ठेवण्यात आलं. घरातील मंडळी त्यांना मनु या नावाने हाक मारत असतं. 4 वर्षांची असताना मणिकर्णिकाच्या आईचे निधन झाले. वडिल मोरोपंत तांबे कानपुरमधील बिठूर जिल्ह्यातील पेशवांकडे काम करत असतं. पेशवा यांनी मणिकर्णिकाला मुलीप्रमाणे सांभाळलं ते तिला लाडाने छबीली म्हणायचे. 

2/7

मणिकर्णिकाचं महाराजा राजा गंगाधर राव नेवलकरसोबत केलं लग्न

मणिकर्णिकाचं महाराजा राजा गंगाधर राव नेवलकरसोबत केलं लग्न

मणिकर्णिकाचं लग्न झाशीचे महाराज राजा गंगाधर राव नेवलकरसोबत झालं. देवी लक्ष्मी या नावावरून लक्ष्मीबाई अस नाव पडलं. राणी लक्ष्मीबाईने मुलाला जन्म दिला पण 4 महिन्याचा होताच त्याचे निधन झाले. त्यानंतर राजा गंगाधर यांनी आपल्या चुलत भावाच्या मुलाला दत्तक घेतले आणि त्याचे नाव दामोदर असे ठेवले. 

3/7

झाशीच्या राणीला किल्ला खाली करून जाण्यास सांगितलं

झाशीच्या राणीला किल्ला खाली करून जाण्यास सांगितलं

राजाचं निधन झाल्यानंतर इंग्रजांनी चुकीचा मार्ग स्विकारला. लॉर्ड डलहौजीने ब्रिटीश साम्राज्य परसवण्यासाठी झाशीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांनी दामोदारला झाशीचा उत्तराधिकारी स्विकारण्यास नकार दिला. झाशीच्या राणीने वर्षाला 60 हजार रुपये पेंशन स्विकारण्यास आणि झाशीचा किल्ला खाली करण्यास सांगितलं. 

4/7

झांसी वाचवण्यासाठी राणी तयार केली सेना

झांसी वाचवण्यासाठी राणी तयार केली सेना

झांसी वाचवण्यासाठी राणी लक्ष्मीबाई यांनी सेना निर्माण करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये तिने गुलाम गौस खान, खुदा बख्श, सुंदर-मुंदर, काशी बाई, लाला भाऊ बख्शी, मोती भाई, दीवान रघुनाथ सिंह आणि दीवान जवाहर सिंह यांची मदत घेतली. 1857 साली राणीने 14 हजार लोकांची सेना तयार केली. 

5/7

राणीने इंग्रजांशी केली लढाई

राणीने इंग्रजांशी केली लढाई

18 जून 1858 मध्ये ह्यूरोज स्वतः मैदानात उतरला. तेव्हा राणी दामोदर राव रामचंद्र देशमुख यांना ठेवून इंग्रजांशी युद्ध करण्यासाठी सोनरेखाजवळ पोहोचली. मात्र त्यावेळी राणीचा घोडा या नदीला पार करू शकला नाही. तेव्हा एका इंग्रजाने राणीवर मागू वार केला ज्यामध्ये राणीला मोठी जखम झाली. त्याचवेळी राणी 23 वर्षी धारातिर्थी पडली. 

6/7

मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी

मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी

कंगना रानौत `मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी` हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन क्रिशने केलं असून सिनेमाची गोष्ट विजयेंद्र यांनी लिहिली आहे. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान कंगना रानौतने घोडेस्वारी आणि तलवारबाजी शिकली आहे. या सिनेमातील हा सीन शुट करताना कंगनाचा अपघात देखील झाला. 

7/7

25 जानेवारी 2019 दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

25 जानेवारी 2019 दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

कंगना रानौतचा हा सिनेमा एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण काही कारणास्तव पोस्ट प्रोडक्शनचं काम पूर्ण होऊ शकलं नसल्यामुळे या सिनेमाचं प्रदर्शत पुढच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात होणार आहे. या सिनेमात कंगना रानौतसोबत अंकिता लोखंडे, सोनू सूद, अतुल कुलकर्णी आणि जिशु सेनगुप्ता असणार आहे.