Kitchen tips : मासे आणि चिकन धुताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर...!

Kitchen tips: मासे किंवा चिकन जर तुम्ही खात असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असेल. कारण घरी मासे आणि चिकन आणल्यानंतर ते सर्वसाधारणपणे स्वच्छ केले जाते आणि धुतले जाते. पण तुम्हालाही मासे किंवा चिकन आणल्यानंतर साफ करण्याची अशी सवय लागली असेल तर तुमच्या आरोग्यासाठी ही गोष्ट चांगली नाही. आज आपण जाणून घेणार आहोत मासे आणि चिकन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत. 

Feb 19, 2023, 14:59 PM IST
1/5

कोळंबी, हलवा, पापलेट, सुरमई असे कोणतेही मासे आणल्यानंतर जर तुम्ही ते कापून आणले असतील तर मग तुम्ही त्याला त्यात एकदाच पाणी घालून धुवून घ्या. आणि मग त्यात मीठ घाला.  

2/5

शिंपल्या, खेकडे या सारखे मासे स्वच्छ करताना ते बरेचदा धुतले जातात. कारण शेल असलेल्या माशांमध्ये अनेकदा समुद्राची वाळू अडकलेली असते. ती जर तशीच राहिली तर तुमचे जेवण अगदीच चरचरीत लागू लागते. त्यामुळे असे मासे किमान दोन चार वेळा धुतलेले बरे असतात. पण तेही फार धुवू नयेत.  

3/5

चिकन घरी आणलं असेल आणि ते कापून आणलं असेल तरी सुद्धा तुम्हाला ते एकदा किंवा दोनदाच फार फार धुवायचे आहे. जर तुम्ही बाजारात मिळणारे साफ केलेलं चिकन आणलं असेल तर तुम्ही ते फार धुवूच नका. अगदी नावाला त्याला पाण्यातून काढा. कारण पॅक करण्याआधी हे चिकन व्यवस्थित धुतलेलं असतं. 

4/5

त्यामुळे आता जर तुम्ही घरी चिकन किंवा मासे आणले असतील तर ते धुताना काळजी घ्या. कारण जर तुम्ही ते खूप धुतले तर तुम्हाला त्या पासून मिळणारे फायदे मिळणार नाहीत.   

5/5

मीठ व्यतिरिक्त, आपण लिंबूने चिकनची घाण देखील काढू शकता. फ्राईंग पॅनमध्ये चिकन आणि लिंबाचा रस घाला आणि हाताने चांगले स्वच्छ करा, नंतर पाण्याने धुवा.