2 मिनिटांत सोलून होईल किलोभर मटार; ही ट्रिक वापरुन बघाच!

हिवाळ्यात मटार मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतो. तसंच, तो स्वस्तही असतो. त्यामुळं गृहिणी वर्षभराचा मटार आणून ठेवतात. पण मटार आणल्यानंतर एक कष्टाचे काम असते ते म्हणजे मटार सोलणे. पण या ट्रिकमुळं अगदी 2 मिनिटांतच किलोभर मटार सोलून होईल. 

| Dec 12, 2023, 18:14 PM IST

Kitchen Hacks In Marathi: हिवाळ्यात मटार मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतो. तसंच, तो स्वस्तही असतो. त्यामुळं गृहिणी वर्षभराचा मटार आणून ठेवतात. पण मटार आणल्यानंतर एक कष्टाचे काम असते ते म्हणजे मटार सोलणे. पण या ट्रिकमुळं अगदी 2 मिनिटांतच किलोभर मटार सोलून होईल. 

1/7

2 मिनिटांत सोलून होईल किलोभर मटार; ही ट्रिक वापरुन बघाच!

kitchen hacks in marathi Easy Trick to peel green peas in 2 minutes

थंडीच्या दिवसात बाजारात मटार सहज आणि स्वस्त उपलब्ध होतो. पण भरपूर मटार आणून ठेवल्यानंतर तो सोलायचा कंटाळा येतोय म्हणून आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत. 

2/7

मटार सोलण्याची पद्धत

kitchen hacks in marathi Easy Trick to peel green peas in 2 minutes

 मटार लवकर सोलण्यासाठी सगळ्यात मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते 3 ते 4 मिनिटांसाठी उकळवून घ्या. नंतर त्यात मटार टाका आणि झाकण लावून घ्या. पाच मिनिटे मटार असाच ठेवा. 

3/7

मटारची चव

kitchen hacks in marathi Easy Trick to peel green peas in 2 minutes

पाच मिनिटांनंतर पाण्यातून मटार एका मोठ्या ताटात काढून घ्या. काळजी करु नका या पद्धतीने मटारची चव थोडीदेखील खराब होणार नाही. 

4/7

टिप-1

kitchen hacks in marathi Easy Trick to peel green peas in 2 minutes

मटार उकळलेल्या पाण्यातून काढून घेतल्यामुळं त्याची सालं नरम होतात आणि आपोआप उघडतात. त्यामुळं हलक्या हाताने दाब दिला तरी लगेचच वाटाणे बाहेर येतात. 

5/7

सोपी पद्धत

kitchen hacks in marathi Easy Trick to peel green peas in 2 minutes

 दुसरी पद्धत म्हणजे मटार मोठ्या ताटात काढल्यानंतर त्यावर पाण्याच्या ग्लासने त्यावर रगडा. त्यानंतर मटार आणि साल वेगळे होतील आणि सोप्या पद्धतीने सोलले जातील.   

6/7

टिप-२

kitchen hacks in marathi Easy Trick to peel green peas in 2 minutes

मटार सोलण्यापूर्वी तव्यावर किंवा ओव्हनमध्ये थोडेसे गरम करुन घ्या. थोडे गरम झाल्यानंतर मटार लगेचच सोलले जातील.   

7/7

टिप-३

kitchen hacks in marathi Easy Trick to peel green peas in 2 minutes

तिसरी टिप म्हणजे मटार सोलण्यापूर्वी त्याच्या सुरूवातीचे आणि मागचे टोक सुरीने किंवा कैचीने कापा म्हणजे मधला भाग मोकळा होऊन वटाणे सोलले जातील.